मंगळवेढा टाईम्स न्युज।
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका आज होणार असून, मतदारांचा गोंधळ होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरची विशेष रचना केली आहे. एका मतदान यंत्रावर दोन निवडणुका होत असल्याने बॅलेट पेपरवर दोन वेगवेगळे रंग वापरण्यात आले आहेत.
बॅलेट पेपरच्या वरच्या भागात पांढऱ्या रंगात जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची नावे असतील, तर त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगात पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे देण्यात येणार आहेत.

या रंगसंगतीमुळे विशेषतः वृद्ध मतदार, महिला तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना योग्य ठिकाणी मतदान करणे अधिक सुलभ होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ गटांसाठी व पंचायत समितीच्या ८ गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार पडत आहे.

तालुक्यात एकूण १८९ मतदान केंद्रे असून, केंद्रांची संख्या व उमेदवारांच्या संख्येनुसार आवश्यक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त मतदान यंत्रेही सुस्थितीत सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली असून, कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहे. मतदानावेळी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास तत्काळ प्रिसायडिंग ऑफिसरकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज शनिवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

मरवडे येथे आदर्श मतदान केंद्र
मरवडे येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून सज्ज करण्यात आले आहे. मतदानादिवशी केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्र ठरले आकर्षण
मंगळवेढा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. साहित्य वितरणासाठी १६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती २४ एसटी बसेस व ३ क्रूझरद्वारे पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचविले आहे. एकूण १८९ मतदान केंद्रांवर १ लाख ६९ हजार ५३६ मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्व केंद्रांवर मतदान पथके ईव्हीएम मशीनसह खाना झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत सखी मतदान केंद्र हे विशेष आकर्षण ठरले आहे. नागणेवाडी येथील नानासाहेब प्रशाला येथे मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचा संपूर्ण कारभार महिला कर्मचाऱ्यांकडूनच सांभाळला जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









