मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शेतजमीन वहिवाटीच्या वादातून सख्खा भाऊ आणि पुतण्याच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून दोरीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन वृद्ध भावाने आत्महत्या केली.
अर्जुन रामा बंडगर (वय ६५) असे मृताचे नाव असून, ही घटना ७ मार्च रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या आधी सांगोला तालुक्यात चिकमहूद बंडगरवाडी (नं १) येथे उघडकीस आली.

याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंभूराजे साळुंखे यांनी खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत अर्जुन बंडगर व विठ्ठल बंडगर सख्ख्या भावंडांत रीतसर शेतजमिनीचे वाटप झाले असून, दप्तरी नोंदी झाली आहे.

परंतु पुतण्या सचिन बंडगर हा चुलता अर्जुन बंडगर यांना समाजातील व्यवहार अपूर्ण असल्यामुळे वहिवाट घालू देत नाहीत. त्यामुळे दोघांचा वाद विकोपाला गेला होता.

दरम्यान, अर्जुन बंडगर यांनी पुतण्या सचिन बंडगर हा जमिनीत वहिवाट घालू देत नाही म्हणून भाऊ विठ्ठल बंडगर व पुतण्या सचिन बंडगर यांच्या नावे चिठ्ठी लिहून शुक्रवारी सकाळी ६ वा. पूर्वी घरापासून ६०० फूट अंतरावर आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतला.

दरम्यान, वडील घरात नाहीत म्हणून मुलगा अनिल याने त्यांच्या मोबाइलवर कॉल केला असता रिंगचा आवाज आंब्याजवळ वाजू लागला. त्याने आईसह आंब्याच्या ठिकाणी धाव घेतली असता वडिलांनी गळफास घेतल्याचे पाहून दोघांनी हंबरडा फोडला.

वडिलांना खाली उतरून मुलाने तातडीने उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












