मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
एक वर्षापूर्वी व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून सतत त्रास देऊन जातिवाचक भाषा वापरून धमकी दिली.
सावकारकीच्या त्रासास कंटाळून नगरपालिकेतील सफाई कामगार गणेश गोविंद बनसोडे (वय ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी गाडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोरील एका कॅन्टीनमध्ये घडली.

पोलिस तपासात व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून मयताने सतत सावकारकीच्या त्रासास कंटाळून चार चिठ्ठया लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत मयताची पत्नी वैशाली गणेश बनसोडे (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी, गडेगाव रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नीलेश खुडे (रा. लहुजी चौक), प्रशांत माने (रा. बालाजी कॉलनी, बार्शी), विशाल गुगळे (रा. बार्शी), अतुल कांबळे (रा. मंगळवार पेठ झोपडपट्टी),

संगीता पवार (रा. बार्शी), सचिन सोनवणे व संतोष कळमकर (रा. बार्शी) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील गणेश बनसोडे हे बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होते. त्यांनी एक वर्षापूर्वी वेळेवर पगार होत नसल्याने त्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे पगारातून जमेल तसे परत फेडत होते,

पण गेल्या ७ महिन्यांपासून गणेश यास व्याजाचे पैसे देण्यास तगादा लावला होता. पण नाही दिले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होते. त्यामुळे तणावात होते. पण या त्रासास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












