टीम मंगळवेढा टाईम्स।
विनापरवाना, रॉयल्टी पावती नसताना स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता विक्री करण्याचे उद्देशाने अवैधपणे चोरून घेऊन जात असताना मंगळवेढा पोलिसांच्या पथकाने पकडून चालक दत्ताञय ज्ञानू करळे (रा.गोणेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, मंगळवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासोबत फिर्यादी व पोलिस उपनिरीक्षक बनकर, चालक यादव हेठाणे हद्दीत शासकीय जीपमध्ये मंगळवेढा ते दामाजी कारखाना रोडने पेट्रोलिंग करत आवताडे सूत मिलजवळ अचानक समोर एक टिपर (एमएच १३ एएक्स ३२७२) आला.
संशय आल्याने सायंकाळी ५:४५ वाजता त्यास हाताने इशारा करून थांबवले. तेव्हा टिपरची पाहणी केली असता त्याचे हौद्यात – सुमारे ४ ब्रास वाळू आढळून आली.
टिपर चालकास वाळू परवाना आहे काय असे विचारले असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना, रॉयल्टी पावती नसल्याचे सांगितले.
त्यामुळे सदरची वाळु ही अवैधपणे चोरून आणून वाहतूक करत असल्याची खात्री झाल्याने सदरचा वाळू भरलेला ११ लाखांचा टिपर व ४ हजार रुपये ब्रास किमतीची ४ ब्रास १६ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली.
टिपर पोलिस उपनिरीक्षक बनकर यांनी चालकासह ताब्यात घेतला. पोहेकॉ दिगंबर महादेव गेजगे फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बठाण पॉइंटवरून येणारी प्रत्येक गाडी तपासली जाणार
बठाण येथील वाळूच्या पॉइंटवरून अवैधरित्या वाळूची पावती न देता रॉयल्टी न भरता बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी पथक तयार केले असून, आज बुधवारपासून प्रत्येक गाडी तपासल्याशिवाय पॉइंटवरून बाहेर सोडली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज