सुरज फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील छायाचित्रकारांचे लॉकडाऊनमुळे मोठे हाल होत आहेत. अडीच महिन्यापासून सर्व फोटो स्टुडिओ बंद असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व मंगल कार्यालये बंद आहेत. विवाह सोहळेदेखील बंद आहेत. सर्व धार्मिक , सामाजिक , राजकीय , कौटुंबिक कार्यक्रम गावातील यात्रा बंद असल्यानेच याचा फटका छायाचित्रकारांच्या व्यवसायावर झाला आहे.अडीच महिन्यापासून फोटो स्टुडिओ बंद असल्यामुळे स्टुडिओतील प्रिंटर , कॅमेरा , कॉम्प्युटर , फ्लॅश आदी साहित्य धुळ खात पडून आहेत. त्या साहित्यांचा वापर होत नसल्याने ते खराब होत आहेत.
फोटो प्रिंटर बंद असल्याने इंकजेट फोटो प्रिंटरचे हेडब्लॉक होत आहेत. नव्याने हेड बसविण्यासाठी हजारों रुपयांचा खर्च छायाचित्रकारांना करावा लागणार आहे. हेड दुरुस्त न झाल्यास पूर्ण नवा प्रिंटर घ्यावा लागेल. त्यासाठी १५ ते २० हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
लॉकडाऊनमुळे आणखीन संकट कोसळले आहे.नव्या छायाचित्रकारानी कर्ज काढून फोटो स्टुडिओ टाकला आहे. कुणी नवीन फोटो , व्हिडिओ कॅमेरे खरेदी केले आहेत. व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचे हप्ते भरणे छायाचित्रकारांना अवघड झाले आहे . शासनाकडून छायाचित्रकारांसाठी विशेष पॅकेज जाहिर करण्याची मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज