मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पुढील ३-४ तासांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मंगळवेढ्यात वादळाने गेली आनेक तास विज गायब झाली आहे.विज वितरणचे आधिकारी उजेडात तर नागरीक आंधारात आशी स्थिती येथे निर्माण झाली आहे.
राज्यात तापमान 44 अंशांवर, घराबाहेर पडण्यापूर्वी दोनदा विचार करा; कोणत्या भागांमध्ये सूर्य ओकतोय आग?
एप्रिल महिन्यापासून संपूर्ण देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळं नागरिकांना आतापासूनच कैक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. देश स्तरावर पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमधील काही अंतर्गत भागांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्रातही चित्र वेगळं नव्हतं. राज्यात सूर्य आग ओकतोय. सध्याच्या घजीला मागील 24 तासांचा आढावा घेतल्यास अकोल्याचा पारा सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं
असून, इथं पारा 44 अंशांवर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. तर, चंद्रपूरात तापमान 43.6 अंशांवर पोहोचलं. हिंगोली आणि परभणीचं तापमानही 41 अंशांवर गेल्यामुळं राज्याच्या विदर्भ भागामध्ये उन्हामुळं चांगलीच होरपळ होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
हवामान विभागानं राज्यातील एकंदर स्थितीचा आढावा घेता उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क केलं आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही चित्र वेगळं नसून इथं दमट हवामानात वाढ झाल्यानं 35 अंशांवरील तापमानाचा दाहसुद्धा 40 अंशांइतका भासत आहे. दुपारच्या वेळी उकाडा आणखी तीव्र होत असल्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात नागपुरात तापमान 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पश्चिम विदर्भातील अकोला आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात तापमान वाढीचा प्रभाव जाणवेल अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज