टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील सहकार भूषण म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे प्रा.शिवाजीराव काळुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या धनश्री परिवाराच्या माध्यमातून हजारोजणांचे संसार फुलले आहेत. असे प्रतिपादन पंढरपूर येथील प्रसिद्ध डॉ. एम. आर. टकले यांनी केले आहे.
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ७३ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. एम. आर. टकले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जकराया शुगरचे अॅड. बी.बी. जाधव हे होते. व्यासपीठावर प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, भूलतज्ञ डॉ.राजेंद्र जाधव, धनश्री महिला पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, ज्ञानदेव जावीर, बी. एम. माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी शुगरचे संचालक सुरेश भाकरे, डॉ. भीमाशंकर बिराजदार, भीमराव मोरे, चोखामेळा नगरचे उपसरपंच सुहास पवार, अविनाश मोरे, दिगंबर भगरे, प्रभाकर कलूबर्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. एम.आर.टकले म्हणाले की, कायमच्या दुष्काळी परिस्थितीतही आर्थिक क्षेत्रात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेट या दोन्ही आर्थिक संस्था सक्षमपणे काम करीत आहेत.
त्याचबरोबर नुकताच धनश्री परिवारात नव्याने समाविष्ट झालेला खर्डीचा श्री सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना व या दोन्ही आर्थिक संस्था यांच्या माध्यमातून काळुंगे दाम्पत्याने अनेकांचे संसार उभे करण्यात यश आले आहे.
असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी धनश्री परिवाराने उपलब्ध करून दिली. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्रीडा कला क्षेत्रातील अनेक विविध उपक्रमामध्ये धनश्री परिवाराचे योगदान राहिले आहे त्यामुळे धनश्री परिवाराचे नाव सर्वदूर पसरले आहे. याचे खरे श्रेय प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांना जाते.
साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. या आर्थिक केंद्रबिंदू जिवंत ठेवण्यासाठी प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नंदनवन व्हावे म्हणून खर्डीचा श्री.सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना हा चालविण्यासाठी हाती घेतला. त्याची जबाबदारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांच्यावर सोपवली.
त्यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्ववाच्या जोरावर अल्पवधीत सिताराम महाराज साखर कारखानाचे नाव जिल्हाभर उज्ज्वल केले. खरोखरच मंगळवेढेकर इतके भाग्यवान आहेत की, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शोभाताई काळुंगे व त्यांचा धनश्री परिवार यांचा सहवास या मंगळवेढातील लोकांना लाभला. ही अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नंदकुमार शिंदे बोलताना म्हणाले, खऱ्याअर्थाने कोरोना संकटात लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. असे रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजाचे हिताचे असतात. असे सामाजिक हित जोपासण्यास प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री परिवार हा सदैव अग्रेसर असतो.
जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे, प्रा.शोभाताई काळुंगे, डॉ. बी.एम. माने, शिंदे मॅडम यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार धनाजी साठे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, दादासाहेब साठे, समाधान काळे, भैरवनाथ शुगर लवंगीचे अनिल सावंत, उद्योजक संजय आवताडे,
सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, महादेव देठे, गणेश ठिगळे, दत्तात्रय बागल, यादाप्पा माळी, लयभरी उद्योग समूहाचे प्रमोद साळुंखे – पाटील, गौरीशंकर बुरकूल, उमाकांत कनशेट्टी, युवराज गडदे, रामचंद्र बंडगर, ईश्वर गडदे, सतीश दत्तू, प्रकाश काळुंगे, अंकुश पडवळे,
नगरसेवक प्रवीण खवतोडे, माजी नगराध्यक्ष बाबुभाई मकानदार, पांडुरंग भाकरे, प्रकाश जुंदळे, सोमन्ना संगोलकर, सांगोला न. पा. नगरसेवक सोमेश यावलकर, लहू ढगे, सोमनाथ गुळमिरे, शशिकांत केदार, सागर मिसाळ, उत्तम पाटील, अॅड.राहुल घुले, समाधान क्षीरसागर,
आंधळगावचे माजी उपसरपंच दिगंबर भाकरे, युवराज लुगडे, निंबोणीचे माजी सरपंच अर्जुन खांडेकर, सोमनाथ बुरजे, हर्षराज डोरले, राजू वाघमोडे, कैलास मसरे, राजकुमार जलगिरे, हणमंत क्षीरसागर, सिद्राम गुरव धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत,
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे , उद्योजक गंगाराम खांडेकर, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, मोहसीन मुलाणी, निलेश आवताडे, संजय चव्हाण यांचेसह धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेटचे सर्व कर्मचारी व
इतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ७३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.
रक्तदानाचा हा कार्यक्रम सरकारने अटी घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माऊली जाधव यांनी केले तर आभार रमेश फडतरे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज