mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

देवमाणूस! असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी; धनश्री परिवाराच्या माध्यमातून अनेकांचे संसार राहिले उभे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील सहकार भूषण म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे प्रा.शिवाजीराव काळुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या धनश्री परिवाराच्या माध्यमातून हजारोजणांचे संसार फुलले आहेत. असे प्रतिपादन पंढरपूर येथील प्रसिद्ध डॉ. एम. आर. टकले यांनी केले आहे.

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ७३ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. एम. आर. टकले बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जकराया शुगरचे अ‍ॅड. बी.बी. जाधव हे होते. व्यासपीठावर प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, भूलतज्ञ डॉ.राजेंद्र जाधव, धनश्री महिला पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, ज्ञानदेव जावीर, बी. एम. माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,  दामाजी शुगरचे संचालक सुरेश भाकरे, डॉ. भीमाशंकर बिराजदार, भीमराव मोरे, चोखामेळा नगरचे उपसरपंच सुहास पवार, अविनाश मोरे, दिगंबर भगरे, प्रभाकर कलूबर्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. एम.आर.टकले म्हणाले की, कायमच्या दुष्काळी परिस्थितीतही आर्थिक क्षेत्रात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेट या दोन्ही आर्थिक संस्था सक्षमपणे काम करीत आहेत.

त्याचबरोबर नुकताच धनश्री परिवारात नव्याने समाविष्ट झालेला खर्डीचा श्री सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना व या दोन्ही आर्थिक संस्था यांच्या माध्यमातून काळुंगे दाम्पत्याने अनेकांचे संसार उभे करण्यात यश आले आहे.

असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी धनश्री परिवाराने उपलब्ध करून दिली. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्रीडा कला क्षेत्रातील अनेक विविध उपक्रमामध्ये धनश्री परिवाराचे योगदान राहिले आहे त्यामुळे धनश्री परिवाराचे नाव सर्वदूर पसरले आहे. याचे खरे श्रेय प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांना जाते.

साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. या आर्थिक केंद्रबिंदू जिवंत ठेवण्यासाठी प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नंदनवन व्हावे म्हणून खर्डीचा श्री.सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना हा चालविण्यासाठी हाती घेतला. त्याची जबाबदारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांच्यावर सोपवली.

त्यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्ववाच्या जोरावर अल्पवधीत सिताराम महाराज साखर कारखानाचे नाव जिल्हाभर उज्ज्वल केले. खरोखरच मंगळवेढेकर इतके भाग्यवान आहेत की, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शोभाताई काळुंगे व त्यांचा धनश्री परिवार यांचा सहवास या मंगळवेढातील लोकांना लाभला. ही अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नंदकुमार शिंदे बोलताना म्हणाले, खऱ्याअर्थाने कोरोना संकटात लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. असे रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजाचे हिताचे असतात. असे सामाजिक हित जोपासण्यास प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री परिवार हा सदैव अग्रेसर असतो.

जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे, प्रा.शोभाताई काळुंगे, डॉ. बी.एम. माने, शिंदे मॅडम यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार धनाजी साठे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, दादासाहेब साठे, समाधान काळे, भैरवनाथ शुगर लवंगीचे अनिल सावंत, उद्योजक संजय आवताडे,

सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, महादेव देठे, गणेश ठिगळे, दत्तात्रय बागल, यादाप्पा माळी, लयभरी उद्योग समूहाचे प्रमोद साळुंखे – पाटील, गौरीशंकर बुरकूल, उमाकांत कनशेट्टी, युवराज गडदे, रामचंद्र बंडगर, ईश्वर गडदे, सतीश दत्तू, प्रकाश काळुंगे, अंकुश पडवळे,

नगरसेवक प्रवीण खवतोडे, माजी नगराध्यक्ष बाबुभाई मकानदार, पांडुरंग भाकरे, प्रकाश जुंदळे, सोमन्ना संगोलकर, सांगोला न. पा. नगरसेवक सोमेश यावलकर, लहू ढगे, सोमनाथ गुळमिरे, शशिकांत केदार, सागर मिसाळ, उत्तम पाटील, अ‍ॅड.राहुल घुले, समाधान क्षीरसागर,

आंधळगावचे माजी उपसरपंच दिगंबर भाकरे, युवराज लुगडे, निंबोणीचे माजी सरपंच अर्जुन खांडेकर, सोमनाथ बुरजे, हर्षराज डोरले, राजू वाघमोडे, कैलास मसरे, राजकुमार जलगिरे, हणमंत क्षीरसागर, सिद्राम गुरव धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत,

धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे , उद्योजक गंगाराम खांडेकर, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, मोहसीन मुलाणी, निलेश आवताडे, संजय चव्हाण यांचेसह धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेटचे सर्व कर्मचारी व

इतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ७३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.

रक्तदानाचा हा कार्यक्रम सरकारने अटी घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माऊली जाधव यांनी केले तर आभार रमेश फडतरे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री बँकशिवाजीराव काळुगे

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही! परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरणाची अंमलबजावणी; अशी होणार कारवाई शिक्षा

November 27, 2025
Next Post
महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून रुक्मिणी सप्ताहाला सुरुवात; ‘या’ माध्यमातून बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून रुक्मिणी सप्ताहाला सुरुवात; 'या' माध्यमातून बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..