टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथून आईसह दोन मुले अचानक बेपत्ता झाल्याची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली असून त्या बेपत्ता तीघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान एकाच वेळी तीघेजण बेपत्ता झाल्याने खोमनाळ परिसरात खळबळ उडाली आहे.
यातील खबर देणारे हे शेतकरी असून त्यांची 27 वर्षीय पत्नी,13 वर्षीय मुलगा व 9 वर्षीय मुलगी असे तीघेजण दि.23 रोजी
सकाळी 9.30 वा.खोमनाळ येथील राहते घरातून माहेरी जाते असे म्हणून निघून गेले आहेत.ते अदयापर्यंत घरी आलेले नाहीत.
सर्वत्र त्या तीघांचा शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नसल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. 27 वर्षीय महिलेचे वर्णन -अंगाने सडपातळ,रंग सावळा,चेहरा गोल,
नाक बसके,उंची 5 फुट 2 इंच,अंगात नेसणेस लाल रंगाची साडी,लाल रंगाचा ब्लाऊज तर 13 वर्षीय मुलाचे वर्णन- अंगाने सडपातळ,चेहरा गोल,
नाक सरळ,उंची 3 फुट 5 इंच,अंगात पांढरा शर्ट,काळी पँट,तसेच 9 वर्षीय मुलीचे वर्णन-अंगाने सडपातळ,रंग गोरा,चेहरा गोल,
नाक सरळ,उंची 3 फुट, अंगात नेसणेस चॉकलेटी पंजाबी ड्रेस वरील वर्णनाचे तीघेजण कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज