पुण्याहून मृतदेह घेऊन निघालेल्या अॅम्बुलन्सने धावत्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
यामध्ये अॅम्बुलन्स मधील तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर अन्य १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरालगत हा अपघात शनिवारी पहाटे ३.४५ वा . झाला . सर्व जखमींवर सध्या सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन निघाले होते.शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली असता,
सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला (ट्रक क्र . एम.एच. ४३. बी.जी. ४५००) अॅम्बुलन्सची पाठीमागून जोरात धडक बसली.त्यामुळे भीषण अपघात होऊन अॅम्बुलन्स मधील १३ लोक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले.
त्यांपैकी तिघांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये अॅम्बुलन्स कॅबिनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज