टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-मरवडे रोडवर पहाटे व्यायामासाठी फिरायला गेलेल्या हिराबाई नामदेव गोपाळकर (वय 85) या वृध्द महिलेस अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहरात येणारी वाहने बंद करण्याच्या सूचना देवूनही स्थानिक पोलिसांचे याकडे अदयापही दुर्लक्ष असल्याने हा अपघाताचा गेल्या दहा दिवसातील दुसरा बळी ठरला असल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत शहरवासियांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेची हकिकत अशी यातील मयत हिराबाई नामदेव गोपाळकर (वय 85 रा. कुंभार गल्ली) ही वृध्द महिला दि. 13 रोजी सकाळी 6.00 पुर्वी मंगळवेढा -मरवडे रोडवर महिला हॉस्पीटलच्या पुढील बाजूस पायी फिरत असताना अज्ञात वाहनाने सुसाट वेगाने येवून ठोकरल्याने त्या वृध्द महिलेचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला.
अपघाताची खबर न देताना वाहनचालक परस्पर निघून गेला आहे.या अपघाताची खबर मल्लिकार्जून गोपाळकर यांनी पोलिसात दिल्यावर अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
दरम्यान, पंढरपूरकडून व मरवडेकडून येणारी अवजड वाहने मंगळवेढा शहरातून वेगाने पहाटे व दिवसभरातही अधूनमधून जात असतात.अवजड वाहने शहराबाहेरून जाण्यासाठी शासनाने कोटयावधी रूपये खर्चून बायपास रस्ता तयार केला आहे. असे असतानाही शॉर्टकट मारण्यासाठी वाहन चालक शहरातून वाहने नेत असल्याचे चित्र आहे.
पहाटेच्यावेळी व सायंकाळच्या दरम्यान पंढरपूर रोडवर तसेच मरवडे रोडवर वृध्द,महिला यांची फिरणार्यांची संख्या मोठी आहे. यापुर्वीही पंढरपूर रोडवर जवळपास पाच ते सहा लोकांचा अपघातामध्ये फिरायला गेल्यानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी पालिसांना निवेदनेही दिली.
मात्र प्रत्यक्षात अदयापही त्याची कार्यवाही झाली नसल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.मागील दहा दिवसापुर्वीच दामाजी चौकात एका वाहनाने हॉटेल कर्मचार्याचा बळी घेतला होता. हा अपघात होवूनही पोलिसांना जाग न आल्यामुळे दुसरा बळी गेल्याची दिवसभर चर्चा सुरु होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज