मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापुरात सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. सीना नदीला पहिल्यांदाच महापूर आला आहे. यामुळे सोलापूरमधून जाणारे तीन महामार्ग बंद झाले आहेत. तर रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे.
सोलापूर पुणे, सोलापूर कोल्हापूर, सोलापूर विजापूर महामार्गावरील पुलांवर पाणी आलं आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात आज मुख्यमंत्र्यांसह मंत्री पाहणी दौरा सुरू आहे.
मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूर दौऱ्यावर तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लांबोटी पुलावर तर सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील तिऱ्हे पुलावर पाणी आलं आहे. यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. सोलापूर कोल्हापूर महामार्गावर तिऱ्हे पूल पाण्याखाली गेला आहे. या परिसरातील घरं, दुकाने, बँक पाण्याखाली गेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तिऱ्हे गावासह परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. एसटीची बससेवाही बंद करण्यात आलीय. यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकातच अडकून पडले आहेत. सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.
रेल्वेसेवेलाही अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे. सोलापूरमधील रेल्वे रुळाला पाणी लागलं आहे. यामुळे स्थानकातच सिद्धेश्वर एक्सप्रेससह वंदे भारत थांबल्या आहेत. लातूरला जाणारी रेल्वेसेवा ठप्प झालीय. जोपर्यंत नदीचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.
सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर हे दोन्ही महामार्ग बंद झाल्याने बस स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झालीय. तर सोलापूर रेल्वे जंक्शनवरही प्रवाशांची गर्दी आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ सुरू असल्यानं प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफसह इतर पथके कार्यरत आहेत. माढा, बार्शी, करमाळा या भागाला पुराचा मोठा फटका बसलाय.
प्रतीक्षेनंतर सोलापूर मंगळवेढा मार्ग सुरु
थोडयाफार पाणी ओसरत असल्यामुळे सोलापूर मंगळवेढा महामार्ग सुरू करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज