मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्या 12 वर्षाच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी घरात कुणाला काही न सांगता मुंबईला निघाल्या.
पण पोलीसांच्या मुस्कान पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अखेर पंढरपूर बसस्थानकावरुन ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजर केले.
या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढा शहरातील 12 वर्षे वयोगटातील तीन मैत्रिणी शहरातील शैक्षणिक संस्थेत इयत्ता सातवी वर्गात शिकत होत्या. गुरुवार दि. 6 रोजी शाळेत असतानाच या तिघींनी मुंबईला जावून जिवाची हौस करण्याचे नियोजन करून शाळा सुटल्यावर घरी गेल्या.
घरातील नातेवाईकांना न सांगता तिघीनी मंगळवेढा बसस्थानक गाठून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. मुली अचानक घरातून गायब झाल्याने तिन्ही पालकांना धक्का बसला.
या घटनेची खबर पोलीसात जाताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना घटना सांगून
शहर बीटच्या पोलीसांना स्टँड परिसर व प्रशालेचा परिसरातले सी.सी.टी.व्ही.तपासताच या तपासाला दिशा मिळाल्याने
पो. नि. बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश बनकर, विजय पिसे, पोलीस हवालदार वंदना अहिरे, पोलीस हवालदार सुनिता चवरे, श्रीमंत पवार, पोलीस नाईक कृष्णा जाधव आदींचे मुस्कान पोलीस पथकाने रात्री 9.30 वा. पंढरपूर बसस्थानक गाठले.
त्या तिघी मुली मुंबईला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसस्थानकावर बसल्याचे निदर्शनास येताच मुस्कान पथकाने सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी पोलीसांनी त्या तिघीकडे अधिक चौकशी केली असता आम्ही मुंबईला फिरावयास निघालो आहोत असे सांगितले.
आपल्याकडे फिरण्यासाठी किती पैसे आहेत? असे विचारले असता केवळ 60 रुपये असल्याचे त्या तिघी मैत्रिणी सांगताच मुस्कान पथकही कोड्यात पडले.
एवढ्या पैशात तुम्ही मुंबईला जाणार का? व जिवाची हौस करणार का? असा प्रश्न करताच त्यांची बोलती बंद झाली. त्या तिघीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला हजर केले.
दरम्यान आई, वडिलांना बोलावून त्या तिघी मुलींचे पोलीस अधिकार्यांनी समुपदेशन करुन त्यांच्या ताब्यात दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज