टीम मंगळवेढा टाईम्स ।
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असताना मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात तिघेजण परदेशातून आल्याची माहिती समोर आली आहे.त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून , आरोग्य विभाग त्यांच्यावर करडी नजर ठेवून आहे.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत १ लाख १ ९ हजार ८३८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तरीही ४५ हजार १६६ नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही.
दुसरा डोस ४८ हजार ३०४ लोकांनी घेतला आहे तर १ लाख १६ हजार ७०० दुसऱ्या डोसविना राहिले आहेत.
पहिल्या डोसचे काम ७३ टक्के पूर्ण तर दुसऱ्या डोस ३० टक्के पूर्ण झाले आहे. परदेशातून मंगळवेढा शहरात १, खवे १, कचरेवाडी १ असे एकूण तीन नागरिक येथे आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
त्यांची मुंबई विमानतळावर कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाकडून आठ दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाणार आहे.
सध्या या तिघांना आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भाऊसाहेब जानकर यांनी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमार्फत सदस्य, तलाठी, पोलीस पाटलांच्या सहकार्याने आरोग्य विभाग घरोघरी जाऊ लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
विभागाकडून लसीकरणासाठी २५ ते ३० जणांची टीम दररोज कार्यरत आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज