मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
यंदा जानेवारीपासूनच हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतात तापमान चढू लागले असून, दिवसा तीव्र उष्णता आणि रात्री गारवा जाणवत आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणाऱ्या उष्णतेचा अनुभव यंदा फेब्रुवारीतच येत आहे.
मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा मोठा चढ-उतार सुरू आहे. सकाळी गारवा आणि दुपारी कडक उन्ह असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर पुण्यात 35 ते 38 अंशांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.
सातारा आणि कराडमध्येही तापमान 40 अंशांवर गेले आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुके होते, मात्र त्यानंतर आकाश स्वच्छ झाल्याने सूर्यप्रकाशाचा तीव्र प्रभाव जाणवत आहे. हवेमधील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली असून, उन्हाचा तडाखा बसू लागला आहे.
तापमानात तफावत उन्हाचा चटका वाढला
राज्यात तापमानातील तफावत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उन्हाच्या झळा अधिकाधिक जाणवत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोलापुरात राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 ते 20 अंशांच्या दरम्यान होते, तर दुपारच्या वेळी कमाल तापमान 35 अंशांच्या वर गेले आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी गारठा जाणवत असला, तरी दुपारच्या उन्हामुळे उकाड्याने घाम फुटत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानाचा हा ताण कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज