टीम मंगळवेढा टाईम्स ।
नातेवाईकाकडे कार्यक्रमाला घराला कुलूप लावून गेलेल्या कर्जाळ येथील एकजणाच्या घराचे कडी- कोयंडा तोडून चोरट्याने ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार भरदिवसा घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा झाला आहे.
दरम्यान मंगळवेढ्यात भरदिवसा घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याकामी लक्ष घालून येथील होणाऱ्या चोऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
गुन्हा दाखल पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तिपण्णा बंडगर (रा. कर्जाळ) हे शेतकरी मजूर असून ते दि. ३ रोजी सकाळी ८ वाजता शेतावर ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते, तर पत्नी मजूरीने कामाला गेली होती.
फिर्यादीची आई दुपारी दोन वाजता गावात नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असल्याने घराला कुलूप लावून गेली होती. सायंकाळी चार वाजता फिर्यादी परत घरी आल्यानंतर कुलूप तोडलेले त्यांच्या निदर्शनास आले.
घरात जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. पत्र्याच्या पेटीत पाहिले असता २० हजार रुपये किंमतीचे सोन्याची बोरमाळ, १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुसी, २० हजार रुपये किंमतीची आहे.
कानातील सोन्याची फुले, ४ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असे एकूण ५६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात चोरटे बंद घराला टार्गेट करीत असल्याने दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे.
मागील दोन दिवसापुर्वीच मंगळवेढा शहरात हळदीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर जवळपास दोन लाखाचे दागिने चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्याने भर दिवसा घरफोडी करुन पोलीसांना तपासाचे आव्हान दिले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज