टीम मंगळवेढा टाईम्स
घर बंद करुन साखर पुडा व हळदीच्या कार्यक्रमास शहरातील मंगलकार्यालयात गेल्यावर चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने,
रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चोरटे बंद घरे टार्गेट करत असल्याने चोरीची मालिका संपता संपेना.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी मानसिंग गायकवाड हे शेतकरी असून ते धर्मगाव रोडवरील चैतन्य कॉलनीत रहावयास आहेत.
दि.30 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता फिर्यादीचे मामेभाऊ यांचा मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर असलेल्या वीरशैव मंगलकार्यालयात साखर पुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने
फिर्यादी हे घराला कुलूप लावून सहकुटूंब परिवार कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम प्रसंगी चौरंग पाटाची गरज भासल्याने फिर्यादी हे ते नेण्यासाठी रात्री 9.30 वाजता घरी आले असता
त्यांना घराचा कडी-कोयंडा तुटून कुलूप खाली पडल्याचे दिसले. त्यांनी घरात प्रवेश करुन पाहिले असता बेडरुम मधील कपाट उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
या कपाटात 20 हजार रुपयाची किंमतीची सोन्याची ठुसी, 28 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट, 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुबे,वेल,12 हजार रुपये किंमतीचे ओम आकाराचे सोन्याचे दोन पेंडल,
40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन,पेंडल, 24 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या बांगड्या, 10 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा माल चोरट्याने चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात चोरटे दिवसा बंद घरे टार्गेट करुन आपले काम फत्ते करत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सर्व चोर्या या बंद घरातील झाल्या आहेत.
परिणामी यामुळे चोरींची मालिका सुरु झाल्याची चर्चा मंगळवेढा शहरात सुरु झाली आहे. नागरिकांनी परगावी अथवा बाहेर जाताना शेजार्यांना सांगून जावे व शेजार्याने शेजारधर्म म्हणून तो शब्द पाळून एकमेका सहाय्य करु याचे अवलोकन करावे अशा या चोरीच्या घटनांवरुन नागरिकांमधून प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज