टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील तुकाईनगरमधील शिक्षक बाहेरगावी गेल्याचे पाहून चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरात ठेवलेले कपाट 63 हजार रुपयांच्या दागिन्यासह पळविल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रशांत एकतपुरे हे मरवडे येथे माध्यमिक शिक्षक असून दिवाळीच्या सुट्टया लागल्याने ते घराला कुलुप लावून वेळापूर येथे कुटुंबासह गेले होते.
दि. 2 रोजी सकाळी 8.00 वा.घरमालक बाजीराव गवळी यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले की तुमचे घराचे कुलूप कोणीतरी तोडले असून साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.
फिर्यादी हे मंगळवेढयात येवून त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.घरात असलेले चार फुटी कपाट मात्र गायब झाल्याचे दिसले.
या कपाटात 12250 रुपये किमतीची कानातील सोन्याची फुले,18900 रुपये किमतीचे सोन्याचे पँडल,15750 रुपये किमतीचे सोन्याचे मणी,16100 रुपये किमतीच्या सोन्याच्या ठुशी असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कपाटात ठेवला होता.
चोरटयांना कपाटाचे कुलूप न निघाल्याने चक्क दागिन्यासह कपाट घेवून पोबारा केला आहे.दरम्यान हे कपाट छोटया वाहनातून नेल्याचा कयास फिर्यादीने व्यक्त केला असून घराच्या बाहेर अन्य चोरीच्या ठिकाणच्या साडी व पँट पडल्या होत्या.
यावरून अन्य ठिकाणीही चोरटयांनी चोरी केल्याचा संशय आहे.चोरटयांनी अन्य ठिकाणीही चोरी करून एका बोळात साडयांनी भरलेली सुटकेस फेकून दिली होती.
नागरिकांनी पाहिल्यानंतर येथे बघ्यांची गर्दी जमली होती. याचा अधिक तपास शहर बीटचे पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज