टीम मंगळवेढा टाईम्स ।
बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यंदाही या निकालात मुलींनीच बाजी मारली. सोबत हा निकाल पाहून काहींना थोडा धक्का बसला.
आपल्याला आणखी गुण जास्त मिळाले असते, असे ज्यांना वाटते. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण असमाधानकारक वाटत आहेत, अशांना गुण पडताळणीसाठी संधी मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना आज शुक्रवार १० जून ते सोमवार २० जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या मागणीसाठी संकेतस्थळावर जाऊन किंवा लेखी निवेदनाद्वारे अर्जाद्वारे छायांकित प्रत मिळतील.
यासाठी १० ते २० जूनपर्यंत अर्ज करावे लागणार आहे. यासाठी प्रत्येक विषयांच्या उत्तरपत्रिकेसाठी चारशे रुपये शुल्क असून ते विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागणार आहे.
शिवाय ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे.
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुढील पाच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहेत. शिवाय नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या या शाखेतील विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांची दिवसात गुणपडताळणी पुनर्मूल्यांकन उत्तरपत्रिकांसाठी तातडीने करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज