टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहेत
जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
सरकराने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची घोषणा केल्याने, जरांगे यांनी देखील सरकारला 20 तारखेपर्यंत वेळ दिली आहे. तोपर्यंत मराठा समाजाने आंदोलन करू नयेत असे अवाहन जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरवात केली असून, आज त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. मनोज जरांगे यानी 10 फेब्रुवारीपासून अन्नाचा कण देखील घेतला नाही.
सुरवातील त्यांनी पाणी आणि उपचार घेण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे पाहायला मिळाले. शेवटी समाजबांधव आणि काही पत्रकारांनी आग्रह केल्यानंतर जरांगे यांनी पणी घेतले होते.
मात्र, तरीही प्रकृती खालावत चालल्याने चिंता वाढली होती. दरम्यान, न्यायालयाने उपचार घेण्याचे आदेश दिल्यावर जरांगे यांनी उपचार घेण्यास सुरवात केली आहे. मात्र, मागील 10 दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाची धग पाहायला मिळाली.
हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड-परभणी महामार्ग रोखण्यात आला होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा यासाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करून सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी अहमदनगर ते अहमदपूर रस्ता एक तास आडून धरला होता.
त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तर, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा देखील निषेध मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज