mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नव्या नवरीच्या डोळ्यात अश्रू. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो सीमेवर, देश आधी, बाकी नंतर…; महाराष्ट्रातील ‘या’ सुपुत्राला सलाम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 11, 2025
in राज्य
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सध्या भारत -पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्यदलासह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील एका गावचा सुपुत्र कृष्णा अंभोरेने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेचे एक अनोखे उदाहरण देशासमोर मांडले आहे.

नुकतेच कृष्णा विवाहबंधनात अडकला होता. त्याचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी काही क्षणाचाही विलंब न करता कृष्णा भारतमातेच्या सुरक्षेसाठी तात्काळ निघाल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. नुकतंच त्याने लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या केवळ दोनच दिवसांनंतर सैन्यदलाकडून त्याला बोलवण्यात आले. त्यानेही क्षणाचा विलंब न करता देशसेवेसाठी तात्काळ सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला.

यामुळे नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. त्याने भावनांच्या काठावर उभं राहून तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

काल दुपारी २.३० वाजता कृष्णा अंभोरे हा उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. यामुळे गावातील वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते.

गावकऱ्यांनी “जय जवान”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. “देश आधी, बाकी नंतर” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

कृष्णाच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पतीच्या सहवासाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याआधीच विरहाचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण कृष्णाने या भावनांचा विचार न करता तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

मध्यप्रदेशातही वीर सैनिकांची कथा

तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका वीर सैनिकाची कथाही समोर आली आहे. कुरावर गावचा रहिवासी मोहित याचे नुकतेच लग्न झाले होते. १८ एप्रिल ते १५ मे पर्यंत तो लग्नासाठी सुट्टीवर आला होता. गुरुवारी तो विवाहबंधनात अडकला.

मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे मोहितची सुट्टी रद्द झाली. मोहित लग्न होऊ घरी पोहोचल्यानंतर त्याला ड्युटीवर परत रुजू होण्यास सांगितले. यानंतर त्याने पत्नीला हे सांगताच तिनेही यासाठी होकार दिला.

मोहितचे वडील महेश राठौर गावात किराणा दुकान चालवतात. मोहितला बुधवारीच मुख्यालयातून फोन आला आणि शनिवारी त्याला ड्युटी जॉईन करायची असे सांगण्यात आले. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याने परतण्याची तयारी केली. मोहित म्हणाला, ‘मला भारत मातेच्या रक्षणासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे.

मी माझ्या नवविवाहित पत्नीच्या परवानगीने जात आहे.’ मोहितचे सासरे गोपाल राठौर यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी देशाची सुरक्षा सर्वात आधी आहे.

मोहित ड्युटीवर जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला हे आधीच माहिती होते. पण विधी पूर्ण होईपर्यंत आम्ही मुलीला काही सांगितले नाही.’ असे गोपाल राठौर यांनी म्हटले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारतीय सैनिक

संबंधित बातम्या

धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

February 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! साता-बारा होणार कोरा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; ‘या’ दिवशी होणार घोषणा

February 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

पतीच्या निधनाचा धक्का! पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार; साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

February 16, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 6000 हजार रुपये; ‘या’ दिवशी होणार जमा

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मोठी बातमी! सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी; आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार, जाणून घ्या नवे बदल; शासन निर्णयात काय म्हटलं आहे?

ताज्या बातम्या

धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

February 16, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! साता-बारा होणार कोरा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; ‘या’ दिवशी होणार घोषणा

February 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..