टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर शहरातील जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
मंगळवेढा भाजप तालुका अध्यक्ष गौरीशंकर गुरुकुल यांनी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याविरुद्ध तक्रारीचा पाढा पालकमंत्री विखे पाटील यांच्या समोर वाचून दाखवला.
शेतकऱ्यांचे पैसे काढून देण्यासाठी दहा ते पंधरा टक्केची मागणी केली जाते, संबंधित शेतकऱ्याने पैसे नाही दिले तर समोरील शेतकऱ्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले जात असल्याचा आरोप गौरीशंकर गुरुकुल यांनी केला.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्या समक्ष मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या कामकाजा बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत सज्जड दम देत झापले त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाज बदल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना म्हणाले की, “तुम्ही बदली साठी स्वतः हून अर्ज द्या, तुमच्या कामकाज करण्याच्या पद्धती मुळे, तुम्हाला कायदा सुद्धा वाचवणार नाही, तुमच्या बद्दल मोठ्या प्रमाणात गंभीर तक्रारी आहेत,
तुम्ही मला तरी ओळखता का….?”असे म्हणत समिंदर यांना झापले आणि “तुम्ही शुध्दीवर येऊन काम करा” असे ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
तुम्हाला निलंबित होण्याची हौस आहे का….? तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी वेळेत सोडवा नाहीतर तुमच्या बाबतीत पुढील विचार करावा लागेल असे म्हणत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी झापले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज