
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरूणा माळी, नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, 13 नगरसेवक असा त्रिकोट आंदोलनाचा सामना एकमेंकावर आरोप करीत रंगला आहे.
हे आंदोलन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सूरू झाले आहे.
दरम्यान या आंदोलनात नगरपालिकेच्या सर्वच कर्मचार्यांनी उडी घेतल्याने, सोमवारी,मंगळवारी कामकाजाचा दिवस असूनही कामकाज होऊ शकले नाही. नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शभंकर यांनी गार्भीय पूर्वक लक्ष घालून आंदोलन तात्काळ मिटवावे अशी मागणी जनतेमधून होत आहे.
13 नगरसेवकांनी देखील नगरपालिकेच्या बाजूस आंदोलन सुरू केले आहे . त्यांच्या मागण्यामध्ये नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे पती नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करून दबाव आणत आहेत . तक्रार करूनही कारवाई होत नाही . अतिक्रमण काढू नये यासाठी मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणत असून अतिक्रमणास नगराध्यक्षा प्रोत्साहित करत असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी . बनावट शिक्के व प्रमाणपत्राचा वापर करून नगरपालिकेत ठेका मिळालेल्या ठेकेदारावर काळ्याची यादीत टाकण्यात येवूनही पुन्हा ठेका देणे . विकास कामासाठी शहरात मोठ्या प्रमाणात निधी येत आहेत परंतु काम केलेल्या ठेकेदाराची रेल्वे काढा करत असल्यामुळे हे ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत, असा त्यांचा आरोप आहे.
नगराध्यक्षा अरूणा माळी ह्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मनमानी व भ्रष्ट कामकाजाबाबत आंदोलन करीत असून याची संपूर्ण चौकशी करून त्यांना निलंबीत करावे अशी त्यांची मागणी आहे.
फॉर्म नं. 64 वर नगराध्यक्षा यांची स्वाक्षरी घेणे बंधकारक असताना ती न घेता अंदाजे 2 कोटी रूपयीचे बिले परस्पर अदा केल्याचा नगराध्यक्षा माळी यांचा आरोप आहे. घंटा गाडी चालकाची निविदा न काढता दुसर्या ठेक्यातून बिले काढून कर्मचार्यांच्या पी.एफ च्या रकमेत भ्रष्टाचार केल्याचे नगराध्यक्षा माळी यांचे म्हणणे आहे.
संगणक ऑपरेटर व पुरवठा ठेक्यातील कर्मचारी स्वतःच्या गाडीवर चालक म्हणून वापरत आहेत. आवक जावक विभागात झिरो कर्मचारी नेमूण टक्केवारी वर वसुली केली जात आहे. या व अन्य गंभीर स्वरूपात आरोप नगराध्यक्ष माळी यांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यावर केले आहेत.





बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













