टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ते पाटखळ मार्गावर असलेले सोनार्जून किराणा दुकानाचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून चोरटयांनी १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी दिपक उन्हाळे (रा.एकवीरा नगर,मंगळवेढा) यांचे मंगळवेढा ते पाटखळ जाणाऱ्या मार्गावर म्हेत्रे यांच्या शेतात रोडलगत सोनार्जून नावाचे किराणा दुकान आहे.
दि.२६ च्या पहाटे अज्ञात चोरटयांनी दुकानाचे पत्रे वाकवून आत प्रवेश करून सुप्रिम तेलाचे डबे, बिस्कीट बॉक्स, चांदतारा कंपनीचा तांदुळ, साखर व रोख रक्कम असा एकूण १५३५० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीवाचून चोरून नेला आहे.
याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्यामध्ये एकाही चोरास पोलिसांना पकडण्यात अदयाप यश न आल्याने चोऱ्यांची मालिका सुरु असल्याचे बोलले जात आहे.
पोलिस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागात गस्त वाढवून होणाऱ्या चोऱ्या रोखाव्यात अशी मागणी होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज