टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी एका विवाहित युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश सौदागर इंगळे (वय ३२, रा.अरण, ता.माढा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गणेशच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अरण येथे घडली.
इंगळे वस्ती येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गणेश इंगळे याने घरातच आत्महत्या केल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. यावेळी त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली.
त्या चिठ्ठीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशा उल्लेख असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर ही माहिती टेंभुर्णी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून लिखित चिठ्ठीही हस्तगत केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. गणेशच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज