टीम मंगळवेढा टाईम्स।
नोकरी सोडणार नाही म्हणाल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला आणि पतीनेही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अकलूज येथे घडली.
सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलिस ठाण्यात जावयाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन शेख गॅरेज, रा. चिंचोली रोड, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी आफ्रीन फिरोज काझी (वय ३७, रा. अकलूज) हिला व नात जिया हिला मोटारसायकलवरून
अकलूज- वेळापूर रोडने संजयनगर, माळेवाडी येथे आल्यानंतर तेथे तिचा नवरा फिरोज हुकमुद्दीन काझी (वय ४५, रा. अकलूज) याने ‘तू सांगोला येथे राहू नको, तेथील नोकरी सोडून देऊन तू अकलूजला राहायला ये,’ असे म्हणून भांडण काढले.
यावर मुलीने सांगोल्यातील नोकरी सोडून अकलूजला येणार नाही म्हणल्याने चिडून आता जिवंत सोडत नाही असे म्हणून चाकूने तिच्या गळ्यावर भोसकून त्यानंतर त्याने तिचा खून केला. त्याचे घरी जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावर अकलूज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. सासऱ्याच्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोनि भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई डी. टी. शिंदे अधिक तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज