mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एकमुखी मागणी! पशुधन विकास अधिकारी यांची बदली रद्द करा; आमदार समाधान आवताडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी घातले साकडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 11, 2023
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर तानाजी भोसले यांची बदली झाल्याने पशुपालक नाराज असल्याचे चित्र आहे,

डॉक्टर तानाजी भोसले हे गेल्या तीन वर्षांपासून आंधळगाव येथील दवाखान्यात कार्यरत आहेत.

पशुपालकांना पशुउपचार सेवा देण्यासाठी सदैव तत्पर राहून सेवा बजावल्यामुळे पशु आरोग्य सेवेसाठी आंधळगाव भागात डॉक्टर भोसले हे देवदूत मानले जात आहेत.

योग्य उपचार सेवा, 24 तास पशुपालकांना उपलब्ध होणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे, आमदार समाधान अवताडे यांनी डॉक्टर भोसले यांची बदली रद्द करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे.

दूध व्यवसायामध्ये गाईच्या दुधाला दरवाढ मिळाल्याने जवळपास आज शेतकरी कोट्यावधीच्या कर्जात आहे, आज दुधाचे दरही उतरले जात आहेत, अशा परिस्थितीत गेल्या वर्षापासून लंपी सारख्या त्वचारोगाने पशुपालकांचे मोठे नुकसान केले आहे.

लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागले, तरीदेखील आंधळगाव परिसरातील जनावरांना योग्य उपचार देण्यासाठी सरकारी डॉक्टर असताना देखील 24 तास शेतकऱ्यांच्या संपर्कात असणारे कार्यतत्पर तानाजी भोसले डॉक्टरानी लंपी या आजारामध्ये देखील उपचारदरम्यान डॉक्टर भोसले यांनी उपचार सेवेत करिष्मा दाखविला.

आज तालुक्यामध्ये सव्वा लाखाच्या आसपास जनावरांची संख्या असून शेतकरी वर्गासाठी, सेवेसी एकनिष्ठ असणारे पशुवैद्यकीय डॉक्टर आवश्यक आहेत,अन्यथा योग्य उपचार नाही मिळाल्यास, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या पूर्णता बंद असलेल्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाऊन पशुंना योग्य उपचार देण्याचे काम डॉक्टर भोसले यांनी बजावले आहे.

वेळोवेळी सरकारी दवाखान्यातून मिळणाऱ्या लशीकरण कामात आग्रहाने माहिती सांगून आपली सेवा करीत असत,शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मुक्त गोठ्याचे फायदे शिवाय जनावरांची निगा राखणे अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी शिबिर घेऊन  डॉक्टर भोसले यांनी शेतकऱ्यांना प्रबोधन केले आहे,

सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर असले तरी आम्ही त्यांचे कौतुक करीत नाही, मात्र आपल्या कार्याला निष्ठेने जबाबदारीने आपली सेवा बजावणारे डॉक्टर भोसले यांनी जवळपास 900 ते 1000 मोठ्या जनावरावरती शस्त्रक्रिया करून  जीवदान दिले आहे.

आपल्या सेवेत अनेक जंगली प्राण्यांचे देखील ऑपरेशन केले आहे, अशा अनुभवी डॉक्टर भोसले यांची बदली रद्द करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पशु आरोग्य उपचार सेवेसाठी मदत व्हावी अशी मागणी आमदार अवताडे यांच्याकडे शेतकरी करीत आहेत.

एक लाखाहून अधिक मंगळवेढा तालुक्यात जनावरांची संख्या असताना, गेल्या तीन वर्षापासून तालुक्याला पशुसंवर्धन अधिकारी नाही,विस्तार अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे, शिवाय डॉक्टर ब्रह्मानंद कदम यांची देखील करकंब येथे बदली झाली, त्यामुळे मंगळवेढा पशुधन विकास अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे.

मंगळवेढा तालुक्यात आंधळगाव येथे सेवा बजावणारे तानाजी भोसले यांची मंगळवेढा पशुधन विकास अधिकारी म्हणून बदली झाली तरी देखील शेतकऱ्यांना भोसले यांच्याकडून उपचार सेवेची मोठी मदत होणार आहे,

चांगल्या अधिकाऱ्याची  शेतकऱ्यांना उणीव भासू नये, यासाठी भोसले यांची बदली रद्द होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. डॉक्टर भोसले यांची आंधळगाव येथून उत्तर सोलापूर वडाळा येथे बदली झाली आहे.

आमदार समाधान आवताडे यांनी यात लक्ष घालून डॉ भोसले यांची बदली रद्द करावी अशी मागणी पशुचालक करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बदली

संबंधित बातम्या

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
Next Post
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

थरार! कानाजवळ पिस्तूल लावली तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो, धमकी देऊन एकास लोखंडी रॉडने डोक्यात मारून केले गंभीर जखमी; आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..