mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिमानास्पद! मंगळवेढ्याच्या ज्वारीची ओळख होणार देशभर; पोस्ट विभागामार्फत ‘मंगळवेढा ज्वारी’ हे स्पेशल कव्हर प्रसिद्ध

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 27, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत येणाऱ्या, पुणे क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्फत “मंगळवेढा ज्वारी” वर एक विशेष कव्हर श्रीमती जी. मधुमिता दास, पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र , पुणे यांच्या हस्ते जारी करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी श्रीमती जी. मधुमिता दास, पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र, पुणे, अर्जुनसिंह पाटील सहाय्यक आयुक्त, सोलापूर , मदन मुकणे प्रकल्प संचालक, आत्मा ( ATMA), सोलापूर ,सौ.मंगल श्रीरंग काटे सचिव, मालदांडी ज्वारी विकास संघ, मंगळवेढा ,पंढरपूर आणि मंगळवेढा येथील इतर सन्मानित पाहुणे तसेच डाक विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी व नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात पंढरपूर विभागाचे डाक अधीक्षक पी. ई. भोसले यांनी प्रास्ताविकाने केली. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अर्जुन सिंह पाटील सहाय्यक आयुक्त, सोलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील ज्वारीचे महत्व विषद केले आणि टपाल विभागाचे सदर विशेष अवरणासंदर्भात समाधान व्यक्त केले.

श्री.मुकणे यांनी मंगळवेढा ज्वारीचे वैशिष्ट्ये सांगताना मंगळवेढ्याच्या मृदा वैशिष्ट्यांमुळे ज्वारी मध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्माबाबत आणि मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबत सविस्तर माहिती देऊन आत्मा ( ATMA), सोलापूरकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

सौ .मंगल श्रीरंग काटे सचिव, मालदांडी ज्वारी विकास संघ ,मंगळवेढा यांनी मालदांडी ज्वारीस महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन ( G.I.)मिळवण्यासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती सांगितली.

भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्र कार्यालयाच्या माननीय पोस्टमास्तर जनरल श्रीमती. जी मधुमिता दास (भारतीय डाक सेवा ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय डाक विभागाचे कोरोना संक्रमण काळातही कार्य अविरत चालू असल्याचे आवर्जून नमूद केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कोरोना काळामध्ये डाक विभागातील कर्मचारी वर्गाने कोरोना नियमांचे पालन करून १८ हजार कोटी रुपयांचे विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना घरपोच वितरित केले आहे.

याबरोबर डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध बचत योजना, विमा सेवा, आधार सेवा, पासपोर्ट सेवा, आय. पी.पी. बी. सेवा सह इतर सर्व योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगळवेढा डाक उपविभागाचे निरीक्षक हनुमंत चव्हाण व सूत्रसंचालन सहाय्यक पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड यांनी केले.

राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर. बी. घायाळ. सहा. अधिक्षक उत्तर विभाग , नागेश डुकरे डाक निरीक्षक, करमाळा , सचिन इमडे तक्रार निवारण अधिकारी पंढरपुर,प्रशांत काटे,विक्रम सावंजी कृषी विभाग मंगळवेढा यांनी विशेष परिश्रम केले.

मंगळवेढा ज्वारी ही मंगळवेढा तालुक्यातील एक चांगल्या प्रकारे पिकणारे पिक आहे. येथील शेतकरी गेली अनेक वर्षे मोठ्या आकाराच्या पांढऱ्या मोत्यांचे अर्थात ज्वारीचे उत्पादन करीत आहेत.

या ज्वारीस मालदांडी ज्वारी असेही संबोधले जाते. येथील ज्वारीमध्ये ग्लुकोजची मात्रा अधिक असल्याने ती गोड आहे. इतर धान्याच्या तुलनेत ज्वारी मध्ये कार्बोहायड्रेट ,कॅल्शियम ,प्रोटीन ,व्हिटॅमिन ,खनिज पदार्थ,पाचक घटक,ऑंटीअक्सिडेंट अधिक असल्याने ते एक उत्तम खाद्य मानले जाते.

या ज्वारीस दिनांक ३१ मार्च २०१६ रोजी महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.डाक विभागातर्फेम ज्वारीवर विशेष आवरण प्रकाशित करण्यात आल्यामुळे मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची ओळख देशभर होण्यास मदत होणार आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोस्ट ऑफिस

संबंधित बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
Next Post
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..