टीम मंगळवेढा टाईम्स।
मुरुमाची वाहतूक प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी व कोणताही दंड न आकारता जेसीबी सोडण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळ अधिकारी रणजीत मारुती मोरे (रा.औदुंबर नगर, पंढरपूर)
व खासगी त्यांना इसम शरद रामचंद्र मोरे (वय ३७, रा. तुंगत, ता. पंढरपूर) हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
तक्रारदार यांनी भाडेतत्त्वावर घेतलेला जेसीबी मुरुम उत्खननाबाबत मंडळ अधिकारी रणजीत मारुती मोरे व शरद रामचंद्र मोरे यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी ताब्यात घेतला होता.
तसेच तकारदार यांच्या टिपरमधून चोरीच्या मुरुमाची वाहतूक झाली असल्याबाबत सांगून त्यावरून तक्रारदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी अथवा कोणताही दंड न आकारता जेसीबी सोडविण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी केली.
ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव,
पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोहवा सोनवणे, पोना प्रमोद पकाले, अतुल घाडगे, पोकों स्वप्निल सन्नके, शाम सरवसे यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज