टीम मंगळवेढा टाईम्स।
वृक्षप्रेमीचे निधन झाले त्याच्या स्मरणार्थ एका शिक्षकाने स्वखर्चातून गावाच्या परिसरात 150 झाडे लावली या कामाचे कौतुक सोलापूर जिल्ह्यात होत आहे.
स्व.निवृत्ती (आप्पा) बाबर यांच्या स्मरणार्थ conocorpas Dubai ट्री-150 झाडांचे वृक्षारोपन मेजर रामराया बाबर, मेजर दत्तात्रय जगताप (सुभेदार), मेजर पोपट जगताप, नागनाथ बाबर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्व.निवृत्ती बाबर हे वृदाप्रेमी होते. त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमी झाडाचे संगोपन करण्याचे काम त्यांनी केले होते. म्हणून त्यांच्या स्मरनार्थ संतोष पाटील (सर) स्वखर्चातून 150 झाडाचे वृक्षारोपन करण्याचे ठरवले.
त्यावेळी संतोष पाटील यांनी सोहळे ते सोहाळेपाटी या रस्त्यांच्या बाजूनी चिलारी झाडे काढून कोनाकापरस या झाडांची लागवड करण्यात आली.
यासाठी अर्जुन (आण्णा) जगताप यांनी त्या झाडासाठी पाणी देण्याची व झाड जतन करणे हे त्यांनी स्वत:हून स्विकारले.
संतोष पाटील सरांनी या झाडे ड्रीप ही स्वखर्चातून करून दिले.
याप्रसंगी गणेश जगताप, मुकेश जगताप, बेटी जगताप, संतोष गायकवाड, उत्तम बाबर, संजय बाबर, ही कोडक (मामा) दिलीप पाटील, नाथाजी माने बाळासाहेब जगताप, रितेश जगताप, अमोल जगताप उपस्थित होते.
यावेळी नागनाथ बाबर यांनी त्यांचे वडील स्व.निवृत्ती (आप्पा) बाबर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपन करून सर्वांनी यानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात प्राप्तविक संतोष पाटील सर यांनी केले’. ‘नागनाथ बाबर यांनी वृक्षारोपन करण्याची गरज- सर्व तरुण युवकांनी एकत्र येऊन झाडे लावून ते जतन करणे ही काळाची गरज आहे. हे, त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. राजकारण न करता तरुणांनी एकत्र. यावे हा संदेश नागनाथ बाबर यांनी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज