mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठला! पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात; मग पायी वारी का नको? शासनाने पुनर्विचार करावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2021
in राज्य, सोलापूर
विठ्ठला! पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात; मग पायी वारी का नको? शासनाने पुनर्विचार करावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुन्हा एकदा शासनाने पायी वारीबाबत निर्णय घेताना वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केले आहे.

बसमधून मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर वासकर वाडा पंढरपूर येथे अक्षयमहाराज बोलत होते.

मागील वर्षी कोरोना हा आजार लोकांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. कडक लॉकडाउन होते, तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत राजकीय मेळावे झाले.

अक्षयमहाराज म्हणाले, मागील वर्षी कोरोना हा आजार लोकांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. कडक लॉकडाउन होते, तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत राजकीय मेळावे झाले.

मंत्री तथा विरोध पक्षाचे अनेक नेते पंढरपुरात रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. तेव्हा कोरोना फिरायला बाहेर गेला होता. आता वारी आहे, त्यामुळे तो माघारी येईल असे प्रशासनाला वाटते आहे का? ज्यांचे लसीकरण झालं आहे. अशांना केवळ परवानगी द्या, असेही आम्ही मागे वारंवार सांगितले होते.

जेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात, तेव्हा मात्र सुरक्षा पुरवली जाते. आता वारीच्या वेळी गर्दी कशी नियंत्रित करणार या सारखे प्रश्न विचारले जातात याचे आश्चर्य वाटते. वारकरी शिस्तीचे पालन करणारे आहेत. शासनाने कठोर निर्बंध घालावेत. मात्र, सोहळा पायी होऊ द्यावा.

अक्षयमहाराज पुढे म्हणाले, ज्येष्ठांची चिंता असेल तर वयाचे बंधन घालावे. वारीमध्ये अलीकडच्या काळात प्रत्येक संस्थान व दिंडी यामध्ये युवा पिढी मोठ्या संख्येने नेतृत्व करते. आम्हाला तेही मान्य असेल, अगदी त्याबाबतची संख्या ही शासनाने ठरवावी याबाबत आमचे दुमत नाही.

मात्र, सोहळा हा पायीच झाला पाहिजे. ज्या अधिकारी वर्गाला वारकरी वर्गाविषयी माहिती आहे, असे अधिकारी त्या समितीवर नेमावेत. ज्यांचा दुरान्वये सुद्धा संप्रदायाशी संबंध नाही ते काय अहवाल सादर करतील? किमान ही गोष्ट मायबाप सरकारने लक्षात घ्यावी.

प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करण्याची भूमिका संपूर्ण वारकरी संप्रदायाची आहे. मात्र, सोहळा हा पायीच झाला पाहिजे यावर संपूर्ण वारकरी संप्रदायाचे एकमत आहे.

सदर बैठकीस राणामहाराज वासकर, कबीरमहाराज, रामकृष्णमहाराज वीर, कराडकरमहाराज, कंधारकरमहाराज, अनेक संतांचे वंशज व समस्त वारकरी फडकरी युवा वर्ग, वारकरी पाईक संघ सदस्य उपस्थित होते.

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव आहे. शासनाला कोरोनापासून वारकरी वर्गाला त्रास होण्याची भीती जाणवत असेल, तर खास पायी वारी करणाऱ्या वारकरी वर्गासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग पंढरपूर येथे सुसज्ज असे सर्व अत्याधुनिक सुविधा असणारे कोविड सेंटर निःशुल्क उभारेल व त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेईल.- शेखर मुंदडा, विश्वस्त, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र

सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सुबराव पाटील तसेच मल्लिनाथ कलशेट्टी, संदीप पाटील, इंद्रजित देशमुख यांच्या सारखे अनुभवी अधिकारी समितीवर नेमावेत. ज्यांना वारी व वारकरी वर्ग या विषयी जिव्हाळा व आत्मीयता आहे. -अक्षयमहाराज भोसले

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आषाढी एकादशीपंढरपूर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
Next Post
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जाणार; आता मूक नव्हे संघर्ष मोर्चा निघणार

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा