टीम मंगळवेढा टाईम्स।
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथील सरपंचांना आपले सरपंचपद गमवावे लागले असून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
फुटजवळगाव ता.माढा येथील सामाजिक कार्यकर्ते अमर दत्तात्रय पवार यांनी दिनांक २९/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ (१) (ज-३) अन्वये शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरणी
अमर दत्तात्रय पवार यांच्या पाठपुराव्यास यश ग्रामपंचायत सरपंच शोभा बापू पवार यांच्या विरुद्ध त्यांचे ‘ग्रामपंचायत सरपंच’ पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात पुराव्याच्या कागदपत्रांसह तक्रार दाखल केली होती.
सरपंच शोभा पवार यांचे पती बापू शिवदास पवार यांनी सीना माढा पाटबंधारे विभागाच्या जमीनीवर कायमस्वरुपी पत्राशेड मारुन सरकारी जमीनीवर अतिक्रमण केले होते.
सरपंच व तिच्या पतीने कायमस्वरुपी पत्राशेड मारुन सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. सरपंच शोभा पवार व पती यांचे नावे असणाऱ्या घर क्रमांक ५७ त्याचे क्षेत्रफळ २३५५ चौ. फुट मध्ये राहतात.
त्यांच्या घराजवळ सीना माढा पाटबंधारे विभागाची जमीन असून त्या जमीनीमधून पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन असून त्यावर पवार यांनी पत्राशेड बांधलेले होते.
उपविभागीय अधिकारी सिना-माढा प्रकल्प, उपविभाग क्र. ०१. २. भिमानगर यांचेकडून दिनांक १०/०७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केलेला होता. सदर अहवालानुसार सरपंच व त्यांचे पती यांनी शासनाने संपादित केलेल्या जागेवरती अतिक्रमण करुन पत्राशेड बांधल्याचे निष्पन्न होते.
याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तक्रारदार व जाब देणार यांना सुनावणीची संधी देऊन सदर प्रकरणी दिनांक २०/०३/२०२४ रोजी आदेश व निकालपत्र पारित करून तक्रारदार यांचा विवाद अर्ज मंजूर करून शोभा बापू पवार यांचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच म्हणून चालू राहण्यास निरर्ह ठरवून अपात्र घोषित केले.
याप्रकरणी तक्रारदार अमर दत्तात्रय पवार यांचे वतीने अॅड. आशिष वानखेडे, अॅड. सुनील बनसोडे व अॅड. अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.(स्रोत;पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज