मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यातील पोटभाडेकरूस अचानक नोटीस न देता गाळा खाली करण्याच्या सूचना दिल्यामुळे संतप्त झालेल्या पोट भाडेकरूने भर ग्रामसभेत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु तंटामुक्त अध्यक्षाच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ ठळला आहे.
याबाबत सविस्तर असे की तालुक्यातील निंबोणी येथे ग्रामपंचायती वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यामध्ये एका भाडेकरूने शिवानंद आण्णाप्पा घटनटे हा पोटभाडेकरू नेमला. त्या पोटभाडेकरू त्या गाळ्यात झेरॉक्स व स्टेशनरी दुकान थाटले.
जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
त्यावर त्याच्या कुटुंबाची गुजराण चालू असताना प्रजासत्ताक दिनी तो गाळा खाली करण्याच्या सूचना तोंडी दिल्यामुळे आपले कुटुंब रस्त्यावर येईल या भीतीपोटी त्याला तो धक्का सहन झाला नसल्यामुळे गावात येऊन भर ग्रामसभेत गाळा कुलुप बंद करुन त्याची चावी ग्रामसेवकाच्या हातात देत अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
दरम्यान उपस्थितामधून घबराट निर्माण झाली. त्यावेळी उपस्थित असलेले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव ढगे यांनी तात्काळ त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी हिसकावून घेत त्याला बाजूला केले.त्यामुळे मोठा अनर्थ ठळला.झालेल्या या प्रकाराबद्दल ग्रामविकास अधिकारी अभिजीत लाड यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.
येथील ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये ग्रामसेवकांचा मनमानी कारभार सुरू असून त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.ग्रामस्थ या कारभाराने त्रस्त आहेत.
त्यानी कारभारात एक मे पूर्वी सुधारणा करून घ्यावी अन्यथा पुन्हा असेच प्रकार घडतील याची जबाबदारी घ्यावी.नामदेव ढगे,अध्यक्ष तंटामुक्त समिती

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज