टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील गणेश बागेसमोर असलेली “नगरपालिका मुलांची शाळा नंबर एक” या शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील छताच्या प्लॅस्टरचा मलबा काल रात्री कोसळला. या घटनेमुळे शाळा बांधकामाबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
मंगळवेढा तालुक्यात अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत. तर काही दहा-बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.
रात्रीच्या वेळी घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मंगळवेढा नगरपालिका अंतर्गत मुलांची शाळा नंबर एक ही सुरू आहे. शाळेचा रात्रीच्या वेळेस छताचे प्लॅस्टर कोसळले.
1976 मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या या शाळेला सर्वत्र भेगा पडल्या आहेत. परंतु, शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असतं असा प्रश्नही पालकांकडून विचारला जात आहे.
अशा दुर्घटनांना जबाबदार कोण?
नगरपालिकेच्या शाळांमध्ये ही दुर्घटना घडली असून शाळेतील मुख्याध्यापकांनी वेळोवेळी पत्रे पाठवून सुद्धा याची दखल घेतली गेली नाही. स्लॅब कोसळले तेव्हा रात्रीची वेळ होती. त्यामुळं दुर्घटना टळली. दिवसा स्लॅब कोसळला असता तर… या विचाराने पालक हैरानं झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा जीव मुठीत
आपण आपल्या पाल्यांना शाळेत शिक्षणासाठी पाठवितो. पण, शाळा सुरक्षित नसेल तर कसं असा प्रश्न पालकांना पडला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज