टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य शासनाने सर्वसामान्यांना प्रति ब्रास ६०० रुपयांत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाळूची लिलाव पद्धत बंद करून शासनाकडूनच डेपो करून वाळू विक्री करण्यात येणार आहे.
याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत, पण डेपोतून होणाऱ्या वाळू विक्रीमुळे ५०-६० हजार रुपयांस मिळणारी चार ब्रास वाळूची ट्रक आता काही हजारात मिळणार आहे.
यामुळे सर्वसामान्यांना वाळू कमी दरात उपलब्ध होईलच शिवाय मुबलक वाळू मिळाल्याने घरांच्या किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
नदीपात्रातून ते डेपोपर्यंत वाळू उपसा करण्यासाठी मक्तेदार नियुक्त केला जाईल. वाळू उपसा करून डेपोपर्यंत पोहोच करण्यासाठी येणारा खर्च आणि शासनाने जाहीर केलेल्या प्रति ब्रास ६०० रुपये, असे दोन्ही मिळून १२०० ते १५०० रुपये प्रतिब्रास वाळू उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी चार ब्रास वाळूचा ट्रक वाहतूक आणि वाळूसह ५० ते ६० हजार रुपयांना मिळत होता, त्यात मोठी घट होऊन काही हजारांत चार ब्रास वाळू उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास हा एक क्रांतीकारक निर्णय ठरणार आहे.
जिल्ह्यात मागील सहा वर्षांत फक्त एकाच वर्षी लिलावाची प्रक्रिया राबवली गेली. त्यामध्ये फक्त दोन ठिकाणांहून वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर ठिकाणचे लिलाव झाले असले तरी ठेकेदारांनी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगून पैसे मागितले होते.
परत शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा नवीन वाळू उपसा धोरण राबवणार असल्याचे जाहीर केले. नवीन धोरण येणार असल्याचे प्रशासनाकडून लिलावाची प्रक्रिया राबवली नाही.(स्त्रोत; दिव्यमराठी)
सर्वेक्षण, खाणकाम आराखडा मग मंजुरी
डेपोतून वाळू विक्री करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यातून आम्ही दोन ते तीन ठिकाणं निश्चित करणार आहोत. तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण करून जिल्हा समितीला अहवाल सादर करणे,
त्यानंतर खाणकाम आराखडा तयार करणे, राज्य पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाळू उपसा व डेपोतून वाळूचे वितरण ही कार्यवाही असणार आहे.
अद्याप शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यांतून वाळू स्थळाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तुषार ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज