मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
देवदर्शन आटोपून घराकडे परतताना चालकाचा ताबा सुटून धोकादायक वळणावर रिक्षा उलटून ७५ वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली, तर चार भाविक जखमी झाले.
हा अपघात मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी- महूद रोडवर सांगोला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला. चांगुणा अर्जुन मोहिते (७५, रा. करकंब, ता. पंढरपूर) असे मरण पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
मीना रामदास माने (४८), सिद्धू अर्जुन मोहिते (४०, रा. करकंब, ता. पंढरपूर), नंदा सुभाष पवार (५४, रा. मंगळवेढा), लक्ष्मी गणेश चौगुले (३५, रा. दौंड, जि. पुणे) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अनिल रामदास माने (रा. करकंब, ता. पंढरपूर) हे आजी चांगुणा, आई मीना, मामा सिद्धू, मावशी नंदा व मावस बहीण लक्ष्मी असे पाचजण मिळून मंगळवारी सकाळी
पंढरपूर येथून चालक राहुल हनुमंत पवार (रा. जुना कराड नाका, पंढरपूर) यांच्या रिक्षातून (क्र. एमएच १३ सीटी ४२०४) लोटेवाडी (ता. सांगोला) येथील म्हसोबाच्या देवदर्शनासाठी गेले.
देवदर्शन आटोपून दुपारी ४.३० च्या सुमारास परतत असताना आचकदाणीजवळ धोकादायक वळणावर ताबा सुटून रिक्षा रोडच्या खाली पलटी झाली.
अपघातात चांगुणा यांच्या डोक्यास मार लागून जागीच मरण पावल्या. अपघातात चौघे जखमी झाले असून, रिक्षाचालक राहुल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज