मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील ४० पैकी २७ गावांना पाणी मिळाले आहे. या योजनेत समाविष्ट असणारी १३ गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत. या १३ गावांनाही पाणी मिळावे. या योजनेची चांगल्या प्रकारे देखभाल दुरुस्ती व्हावी.
यासाठी आपण लक्ष द्यावे, अशी मागणी आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे केल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. काल आ.अवताडे यांनी सीईओ आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, उद्योजक विक्रम गाडवे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोज काझी, माजी उपसभापती धनंजय पाटील, सरपंच शिवाजी सरगर, शिक्षक नेते विठ्ठल ताटे,महिपती अनुसे, आदीजन उपस्थित होते.
चाळीस गावांसाठी ७२ कोटीची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम ८ ते ९ वर्षे रेंगाळले. या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ट्रायलमध्ये ४० पैकी २७ गावांना पाणी पोहोचले.
उर्वरित १३ गावांनाही पाणी देण्यासंदर्भात उपाय योजना करावी, योजनेची चांगली देखभाल दुरुस्ती ठेवावी, अशी मागणी सीईओ आव्हाळे यांच्याकडे केली असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.
गट टिकविण्यासाठी भगीरथ भालके बीआरएसकडे
पंढरपूर तालुक्यातील आपला गट टिकविण्यासाठीच भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये प्रवेश केला. बीआरएसचा कोणताही यांच्याकडे केली आहे. परिणाम पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार नसल्याचे यावेळी आ.आवताडे यांनी सांगितले.
प्राथमिक शाळांना शिक्षक द्या
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक कमी आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. यामुळे अनेक पालकांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्यांना इतर शाळात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिक्षकांच्या तात्काळ नेमणुका करा, अशी मागणी आ.आवताडे यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरि)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज