mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोरांनो तयारीला लागा! राज्यात लवकरच ‘इतक्या’ हजार पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार; गृहमंत्र्यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 29, 2022
in राज्य
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती.

पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

5200 पदांची भरती अंतिम टप्प्यात

राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे.

विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.(स्रोत:TV9 मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस भरती

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Next Post
मंगळवेढा तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.धनंजय सरवदे यांची नियुक्ती; डॉ.नंदकुमार शिंदे यांची बदली

खळबळजनक! मंगळवेढ्यातील 'या' शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर हस्तांतरणास बंदी असा शेरा मारण्याचे आदेश

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा