mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दादांचा कारभार, पवार साहेबच सूत्रधार? प्रत्येकाच्या मनात डोकावतोय प्रश्न; पण याची कारणं काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 5, 2023
in राज्य
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

गेले दोन दिवस राज्यात घमासान सुरू आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. फरक इतकाच आहे की शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळाली, पण राष्ट्रवादी फुटली तेव्हा शरद पवारांना सहानभुतीसोबत प्रश्नचिन्ह मिळालंय.

राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे का असा प्रश्न रविवारपासून प्रत्येकाच्या मनात डोकावतोय. पण याची कारणं काय आहेत?

24 वर्षांचा पक्ष 15 वर्षांची सलग सत्ता शेकड्याने आमदार-खासदार, हजाराने पदाधिकारी, लाखो कार्यकर्त्यांचं जाळं हे सगळं एका दमात हिरावलं. तेही आपल्याच पुतण्यानं पवार धक्क्यात असतील, पवार कोलमडले असतील असं अनेकांना वाटलं होतं.

पण पवारांनी पत्रकार परिषदेत थेट लोकांमध्ये जाऊन संघर्षाची भाषा केली. पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रवादीच्य्या बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही आणि त्याला कारणंही तशीच आहेत

कारण क्रमांक एक दादांविरोधात न्यायालयात न जाणे

पक्ष फुटल्यानंतर दोनच तासांत पवारांनी पक्षाच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात जाणार नाही असं स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत पवारांनी अजित पवारांना एकदाही दुषण दिलं नाही. बंडखोरी, पक्षफुटी, गद्दारी यातला एकही शब्द पवारांच्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत नव्हता.पक्ष फुटल्यानंतर अनुभवी नेत्याचं शांत राहणं समजलं जाऊ शकतं पण कायदेशीर लढाईला थेट नकार देणं प्रश्नचिन्ह निर्माण करणार होतं.

कारण क्रमांक दोन सुप्रिया सुळे, रोहित पवारांचीही सौम्य भाषा

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही आपल्या भूमिकेत पवारांचाच कित्ता गिरवला. दोघेही अजित पवारांच स्थान मान्य करत राहिले. सुप्रिया सुळे, रोहित पवारांचीही सौम्य भाषा वापरली आहे. पक्ष फुटल्यानंतरही दादांची पाठराखण करण्याची इतकी धडपड का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारण क्रमांक तीन वर्षभराच्या मंत्रिपदासाठी हे तिघे दादांसोबत का जातील?

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे पवारांचे खास म्हणून ओळखले जातात. हे तिन्ही नेते एका क्षणात अजित पवारांसोबत जातात हे सहज मान्य होण्यासारंख नाही. दिलीप वळसे पाटील यांच्यामागे तर ईडीही नव्हती मग फक्त वर्षभराच्या मंत्रीपदासाठी हे नेते दादांसोबत जातील. हे फक्त प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.

कारण क्रमांक चार एकमेकांना सांभाळण्याची इतकी धडपड का?

एकीकडे अजित पवारांनी पक्षावर ताबा घेतोय असं दाखवलं. पण पक्षाध्यक्ष शरद पवारच राहतील हे स्पष्ट केलं. पवारांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष बदलले पण बॅनरवर पवारांचे फोटो ठेवले . दुसरीकडे कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळं फासलं. तर जितेंद्र आव्हाडांनी ते आपल्या हातानं पुसलं.

कारण क्रमांक पाच राष्ट्रवादीला वर्षभर आधीच भाजपसोबत जायचं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्याची स्क्रिप्ट वर्षभर आधीच ठरली होती असा आरोप विरोधक करतात. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बंडालाराष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा आधीच सुरू झाली आणि खुद्द जितेंद्र आव्हाड त्याला दुजोरा देतात.

कारण क्रमांक संघटनेतील बदल घटनेत नमूद न होणं

अजित पवारांची नाराजी आणि शरद पवारांचं राजीनामानाट्य यावरून राष्ट्रवादीत सगळं आलबेल नाही हे प्रत्येकाला कळत होतं अशा परिस्थितीत पवारांनी संघटनात्मक नेमणूका केल्या. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं पण या सगळ्याची नोंद पक्षाच्या घटनेत केलीच नाही ती नंतर करू असं पवारांनी सांगितलंपण या बदलांनंतर फक्त दहा दिवसांत पक्ष फुटतो आणि या नेमणूका कागदावरच राहतात ही चूक म्हणायची की राजकीय खेळी?

पक्ष फुटल्यानंतर आता पक्षावर दावे सांगण्याच्या खेळी एकीकडे सुरू झाल्यात तर दुसरीकडे लवकरच अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल अशीही चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादीला भविष्यात सरकारमध्ये काय स्थान मिळतं आणि 2024 च्या निवडणुकांना राष्ट्रवादी कशी सामोरी जातेय यावरच दुपारच्या शपथविधीमागची कारणं आणि सूत्रधार स्पष्ट होतील.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी कोणाची

संबंधित बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
कुछ तो गडबड है! अजित पवारांसोबत 40 आमदार बंडाच्या तयारीत? चर्चांना उधाण

शरद पवारांच्या धोरणामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळाले नाही; अजित पवारांचा मोठा बॉम्बस्फोट

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा