टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विशेषतः मंगळवेढा शहर व तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संपर्क ठेवता यावा, त्याचबरोबर जनतेच्या विविध मूलभूत अथवा पायाभूत प्रश्नांच्या अनुषंगाने विचारमंथन व्हावे आणि
जनता व लोकप्रतिनिधी यांच्यात आपुलकीच्या स्तरावर लोकाभिमुख असे समीकरण तयार झाले पाहिजे अशा नानाविध उद्देशाने या जनसपंर्क कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
आ.समाधान आवताडे यांनी थेट जनतेत मिळून आणि मिसळून कार्य करणारे एक सर्वसमावेशक लोकप्रतिनिधी म्हणून अगदी कमी कालावधीत आपली एक वेगळी ओळख समाजकारण आणि राजकारण यामध्ये निर्माण केली आहे.
त्यामुळे हे जनसंपर्क संपन्न जनसपंर्क कार्यालय आ.समाधान आवताडे यांच्या दांडगा जनसंपर्क आणि कृतिशील कार्यशैली यांना खूप मोठी व्यापकता निर्माण करेल असा आशावाद याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे, उद्योजक विश्वास दाते आदी मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज