mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डॉ.शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून आता ‘या’ व्यक्तींच्या चौकशीची शक्यता; नेमकं काय आहे कारण?; सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षपर्यंत जाणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 22, 2025
in आरोग्य, सोलापूर
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सोलापुरातील डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ.शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर आणि सून डॉ.सोनाली वळसंगकर यांना चौकशीसाठी पोलीस बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ.आश्विन याने दिलेल्या फिर्यादीवरून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मनीषा मुसळे-माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या महिलेची चौकशी सुरू आहे.

फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिस डॉ.आश्विन वळसंगकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतील. मात्र, आतापर्यंत या प्रकारणात केवळ आरोपी मनीषा मुसळे-माने हिचीच चौकशी पोलिसांनी केली आहे.

या चौकशीत नेमकं काय समोर आलं आहे, या बाबतीत कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. दरम्यान सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षपर्यंत पाहोचू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात डॉ. वळसंगकरांचे एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर आरोप
ज्याला शिकवून मोठं केलं, चांगला पगार दिला त्याच्याकडूनच घाणेरडे आरोप, धमकी आल्याचं सांगितलं. याचंच दुःख झाल्यानं डॉ. वळसंगकरांनी घेतला टोकाचा निर्णय.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने डॉ. वळसंगकरांवर घाणेरडे आरोप करत त्यांना आत्महत्येची धमकी दिली होती. तेव्हापासून डॉ. वळसंगकर तणावात होते.

शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री 8 वाजता डॉ. वळसंगकर हॉस्पिटलमधून घरी परतले आणि साडेआठ वाजता त्यांच्या बेडरुममधून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. त्यावेळी डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डॉक्टर असलेल्या त्यांच्या मुलानं आणि सुनेनं वळसंगकरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण साडेदहा वाजता त्यांनी प्राण सोडला.

डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या संशयित महिलेच्या वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, माझ्या आशिलाद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की मी फक्त मेल केला आहे बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत.

संशयित महिलेला आता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 17 एप्रिलला तिनं डॉक्टरांवर केलेल्या आरोपांच्या ईमेलची प्रतही जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर?

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले.

लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले.

बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम
शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले. रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.

मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आत्महत्याशिरीष वळसंगकर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर, गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले; मंगळवेढा तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर महिलाराज; गाव निहाय आरक्षण जाणून घ्या…

सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर, गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले; मंगळवेढा तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर महिलाराज; गाव निहाय आरक्षण जाणून घ्या...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा