टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून सर्वाधिक उमेदवार हे लक्ष्मी दहिवडी गटातून लढत असल्याचे दिसत आहे.
भोसे गटातून भाजप कडून प्रदीप खांडेकर व तीर्थक्षेत्र आघाडीकडून बसवराज पाटील अशी थेट लढत होणार आहे तर वंचित बहूजन आघाडीकडून बापू मेटकरी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

रड्डे गणातून भाजपकडून दत्तात्रय कांबळे व तीर्थक्षेत्र आघाडी कडून सुरेश कांबळे अशी थेट लढत होणार आहे तर वंचित आघाडी कडून साधू गेजगे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.
तर भोसे गणातून भाजप कडून अप्पासो निकम व शिंदे यांच्या शिवसेनेकडून कर्मवीर आवताडे व काँग्रेस कडून प्रवीण मेटकरी अशी लढत होणार आहे.

संत दामाजीनगर गटातून भाजपकडून रमेश भांजे व तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून महावीर ठेंगील अशी लढत होणार आहे तर अपक्ष अमोल टेले यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

बोराळे गणातून भाजपकडून जयश्री कवचाळे व राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुमय्या तांबोळी अशी लढत राहणार असून अपक्ष उमेदवार सारिका घासाडे यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

दामाजीनगर गणातून भाजपकडून सविता कोकरे व तीर्थक्षेत्र आघाडीकडून जयश्री शिंदे अशी दुरंगी लढत होणार आहे.
लक्ष्मी दहिवडी गटातून भाजप कडून करुणा शिवशरण, काँग्रेसकडून कविता खडतरे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोमल ढोबळे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिभा शिवशरण तर अपक्ष ज्योती सोनवले अशी बहुरंगी लढत होणार आहे.

चोखामेळानगर गणातून भाजपकडून दीपाली ताड व तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संगीता लेंडवे अशी दुरंगी लढत होणार आहे.
तर लक्ष्मी दहिवडी गणातून भाजपकडून विनायक यादव, तीर्थक्षेत्र आघाडीकडून काकासाहेब मोरे, शिंदे यांच्या शिवसेनेकडून आबासाहेब लांडे, वंचित आघाडीकडून महादेव ढोणे,आम आदमी पार्टीकडून काशीलिंग रणदिवे, दीपक आसबे व संतोष माने अपक्ष असून बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हुलजंती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून जयश्री माने व भाजप संगीता दुधाळ अशी दुरंगी लढत होत असून याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे.
मरवडे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून उन्नती सुरेश पवार व भाजपकडून मोहिनी पाटील तर अपक्ष म्हणून मीनाक्षी सूर्यवंशी अशी तिरंगी लढत होणार आहे.
हुलजंती गणातून भाजपकडून अर्जुन मल्लाळे तर तीर्थक्षेत्र आघाडीकडून महादेव पिटर्गे अशी दुरंगी लढत होणार आहे.
मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांचे चिरंजीव आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, माजी समाजकल्याण सभापती, माजी पंचायत समिती सदस्य, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या प्रमुखांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे मंगळवेढ्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि सर्वपक्षीय आघाडी असा सामना होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभरामध्ये मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी दामाजी नगर, भोसे या जिल्हा परिषद गटाबरोबर लक्ष्मी दहिवडी गणातील उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे.
तसेच, माजी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण आणि माजी पंचायत समिती सदस्य उज्वला मस्के यांनी लक्ष्मी दहिवडी गटातील उमेदवारी अर्ज मागे घेतला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेपुरती मर्यादित न राहता, थेट राजकीय ताकद मोजण्याचा आणि आगामी निवडणुकीची नांदी ठरणारा सामना बनली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती सदस्य पदासाठी बहुपक्षीय उमेदवार रिंगणात असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेपुरती मर्यादित न राहता, थेट राजकीय ताकद मोजण्याचा आणि आगामी निवडणुकीची नांदी ठरणारा सामना बनली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










