मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा व पंढरपूर येथील जनतेने मतदारसंघाच्या विकासासाठी अभिजीत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.
मंगळवेढा नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले ते आज दामाजी चौकात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, धनश्रीचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझमिल काझी, सुरेश कट्टे, जमीर इनामदार आदीजन उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढेकरांनी आतापर्यंत राष्ट्रवादीला भरभरून प्रेम दिले आहे, इथून पुढेही असेच प्रेम द्यावे, माझ्यासोबत अनेक लोकांनी काम केले आहे.
मंगळवेढ्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत त्यासाठी आपण अभिजीत पाटलांच्या पाठीमागे राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
खा.शरदचंद्रजी पवार यांचा आज मंगळवेढा येथे दुपारी १२ वाजता माचाणूर चौक येथे स्वागत व तिथून (शेतकरी हाॅटेल पासून) रॅली काढण्यात आली. तसेच मंगळवेढा शहरा लगत पहिल्या ब्रीज पासून बोराळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली.
शरद पवार हे राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुढील कार्यक्रमासाठी सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज