mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाविकास आघाडी सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी; ‘या’ आमदाराचे सूचक विधान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 21, 2022
in राजकारण
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिवसेनेच्या नाराज आमदारांची संख्या ४२ वर गेल्याची चर्चा आहे.हे खरे असेल तर सरकार पडण्याची आता औपचारीकताच बाकी आहे. सरकारमधील नाराज आमदार संधीची वाट पाहत होते. ती संधी आता आली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पाचही जागा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारची ही लिटमस टेस्ट जनता अनुभवत आहे.

आजचा दिवस हा भाजपच्या नेत्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचा आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार राहुल कुल यांनी बोलताना दिली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भूमिका जशी महत्वाची ठरली. तसेच, हे सरकार पडले तर त्यात संजय राऊत यांचा वाटा मोठा असेल, असा दावाही आमदार कुल यांनी केला आहे.

राहुल कुल हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

राहुल कुल म्हणाले, शिवसेनेचे आमदार एका रात्रीत गायब झाल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. एकूणच मंत्री व आमदारांमध्ये इतका असंतोष असेल तर जनतेमध्ये किती असंतोष असेल, याचा यावरून अंदाज घेता येऊ शकतो.

मंत्री व आमदारांची न होणारी कामे, गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांमुळे सरकारची डागाळलेली प्रतिमा, सरकारमधील समन्वयाचा अभाव या सर्वांचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटले आहे.

महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदारांमध्येच परस्परांबद्दल खूप नाराजी आहे. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व सरकारमधील नाराजी या दोन महत्वाच्या बाबींचा निकालावर परिणाम झाला आहे.

पाचव्या जागेसाठी शून्यापासून सुरुवात करणाऱ्या भाजपने प्रचंड मोठी मजल मारली आहे. विजयासाठी २५.७६ मतांचा कोटा असताना ही मते २८ ते ३० पर्यंत गेली आहेत.

मोठ्या फरकाचा विजय हा भाजपचा उत्साह वाढविणारा आहे. देवेंद्र फडणवीस यांची विद्वत्ता आणि भाजपच्या नियोजनामुळे हे शक्य झाले आहे, असेही कुल यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या मतमोजणीसाठी भाजपने ज्या आठ आमदारांवर ही जबाबदारी सोपवली होती, त्यात माझाही समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि मतमोजणीसाठी माझी निवड केली.

हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. तो मी तू कधीही विसरू शकत नाही. मतमोजणीसाठी आमदार राहुल कुल यांच्यासह आशिष कुलकर्णी, राम सातपुते, बंटी भांगडिया, अमित साटम, अतुल सावे, सिद्धार्थ शिरोळे, मेघना बोर्डीकर यांची निवड करण्यात आली होती.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ठाकरे सरकार

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

January 10, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा

January 6, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

January 6, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे  मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी

December 29, 2025
जोडीनं अंबाबाईचं दर्शन! आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले ठरवून…

फॉर्म्युला वन रेसिंग,’ आर्ची’शी लग्नाची चर्चा अन् आता कृष्णाराज ‘या’ निवडणुकीच्या रिंगणात; महाडिकांची तिसरी पिढी मैदानात

December 29, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार; ‘या’ नावांची चर्चा सुरू; कोणाला संधी मिळणार?

December 23, 2025
Next Post
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

ठाकरे सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले...

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा