टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराच्या गाईच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून ती आता संख्या १५ वर पोहचली आहे. या गाईंचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
दरम्यान लंपी आजाराने एका गाईचा मृत्यू झाल्यामुळे पशुपालकात खळबळ उडाली आहे. मागील आठवडयात लंपी आजाराच्या गाईची संख्या १० होती. त्यामध्ये अजून ५ गाईंची भर पडल्याने आता ती १५ वर पोहचली आहे.
शेलेवाडी १ , हुन्नूर १ , शिरनांदगी १ , कात्राळ २ या गावातून गाईंचा लंपी आजार वाढला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ४८ हजार गाई पैकी ४२ हजार गाईंना लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.ब्रह्मानंद कदम यांनी दिली.
खुपसंगी येथील लंपी आजार झालेली एक गाई मृत पावल्याचे सांगण्यात आले. पुर्वी १० गाईंना लंपी आजार झाला होता त्यामधील २ गाई बऱ्या झाल्या असून उर्वरीत गाईवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पशुपालकांनी लंपीचे गाईमध्ये लक्षणे दिसताच तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा तसेच वाडयावस्त्यावरील ज्या पशुपालकांनी अद्यापही गाईंना लसीकरण करून घेतले नाही,
त्यांनी परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज