टीम मंगळवेढा टाईम्स।
पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम ‘एनईपी- २०२०’च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. ‘एनईपी’नुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे.
नर्सरीसाठी ३ वर्षाची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील,
हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्ट केले.
तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे. दरम्यान, लहान मुले रात्री उशिरापर्यंत (साधारणतः अकरा वाजेपर्यंत) झोपत नाहीत. त्यानंतर सकाळी सात वाजता शाळेत पोचण्यासाठी त्याला सहा साडेसहा वाजता उठविले जाते.
त्यामुळे त्याला सात तासांपर्यंतच तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकायनि धोरण तयार करण्यात येत आहे.
झोप मिळते आणि त्याचा थकवा शाळेत जाणवतो. अशा मुलांमध्ये चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो, अशी स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी नऊनंतर असणार आहेत, अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिली.
पुढच्या वर्षी ‘एक राज्य एक गणवेश’
राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल
तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहे.
‘प्राथमिक शिक्षण’कडून प्रस्तावाची तयारी
चिमुकल्यांची शाळा सकाळी सात ते साडेसात वाजता भरत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर विपरीत परिणाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सर्वच शाळा सकाळी नऊनंतरच भरतील,
असा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण खात्याकडून तयार केला जात आहे. त्याला मान्यता घेऊन प्रस्तावानुसार त्याची अंमलबजावणी २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षांपासून होईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज