टीम मंगळवेढा टाईम्स ।
एम.पी.मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य चिदानंद माळी यांनी सोड्डीचे गावाचे नाव लौकिक केले असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच तम्माराय बिराजदार यांनी केले आहे.
‘स्वाभिमानी शहर’च्यावतीने आदर्श शिक्षक म्हणून चिदानंद माळी यांना पुरस्कार प्राप्त झालेेबद्दल विकास सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव बिराजदार व माजी सरपंच तम्माराय बिराजदार यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी रेवणशिद्ध मडीवाळ (गुरुजी) ग्रामपंचायत सदस्य विनोद बिराजदार,श्रीशैल बिराजदार,संगप्पा बिराजदार, बसवराज पाटील, कासन्ना बिराजदार,संतोष बिराजदार,सिद्राय बिराजदार,मल्लप्पा बिराजदार,महादेव म्हेत्रे, सोमनिंग म्हेत्रे,रामगोंडा कमते,चिदानंद जिरंकलगी,जगदेव पाटील, भरमु खांडेकर, अशोक कमते,महेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बिराजदार पुढे बोलताना म्हणाले की, ‘स्वाभिमानी शहर’ च्यावतीने आदर्श शिक्षक म्हणून चिदानंद माळी यांची निवड झाल्यानंतर गावचे नाव लौकिक झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल स्वाभिमानी शहर यांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज