टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याच्या आणि पूर आल्याच्या बातम्या येत आहोत. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे खरं तर थंडीचे महिने; पण या महिन्यांत पाऊस पडू लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं असून, अनेक ठिकाणी पूर आले आहेत.
तापमानातही प्रचंड घट झाल्यानं थंडीचा कडकाही वाढला आहे. यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी वर्गही चिंताग्रस्त झाला आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस
आज सोलापूर जिल्हा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे.
अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
अचानक असा पाऊस पडण्यामागे काय कारण आहे,
पुढील काही दिवसांतल्या हवामानाच्या स्थितीचा अंदाजही वर्तवला आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूनंतर 1 ते 6 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
2 ते 3 डिसेंबर रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्स देशात धडकण्याची शक्यता असल्यानं हा पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
गुजरात, कोकण आणि महाराष्ट्रातही 1 आणि 2 डिसेंबरच्या रात्री पाऊस पडू शकतो. असा अंदाजही शास्त्रज्ञांनी वर्तवला होता.
तो खरा ठरल्याचं राज्यातल्या आजच्या हवामानावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे.
या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय असतं, याबाबत हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा देशातलं हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन आणि लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते.
वाऱ्याची दिशा असेल, त्याच दिशेला हा डिस्टर्बन्स निर्माण होतो. ही दिशा समजून घेऊन, हवामानशास्त्रज्ञ वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवतात. या वर्षी 2 ते 3 डिसेंबरदरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्स येऊ शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त वर्तवला आहे.
उन्हाळ्यातल्या पावसासाठी दक्षिणेकडून येणारे वारे कारणीभूत असतात. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाची कारणंही वेगळी असतात.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुसळधार पाऊस पडतो. त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो.
भूस्खलन, पूर आणि हिमस्खलनाच्या घटना घडू शकतात. तसंच यामुळे थंडीची लाट येऊ शकते. दाट धुकंही पडू शकतं. अनेक दिवस ही स्थिती राहू शकते, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज