टीम मंगळवेढा टाईम्स ।
सहसा स्मशानभूमी म्हटलं की; प्रत्येक माणसाच्या मनात वेगळीच भिती निर्माण होते कारण स्मशानभूमीत कोणाला जावसं वाटत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाच्या देहाला अग्नी दिला जातो, व एक जीव या सृष्टीला सोडून जातो.
परंतू भालेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. श्री. श्रीकांत एकनाथ दवले यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात भालेवाडी गाव झाडांचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
पूर्वी लोक स्मशानभूमीच्या बाजूने जायला घाबरत होते परंतू आता सध्या गावासह स्मशानभूमीचाही कायापालट झाला आहे. त्यामुळे लोक स्मशानभूमीत भर रात्री देखील जायला घाबरत नाहीत.
म्हणूनच माजी ग्रामपंचायत सदस्य (मेंबर) दिलीप शिवशरण यांनी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव भोरकडे यांनी सरपंच डॉ.श्रीकांत दवले यांचे बंधू व
नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १, मंगळवेढा येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शक मारुती दवले गुरुजी यांचा वाढदिवस स्मशानभूमीतचं साजरा करायचा असा निर्णय घेतला.
या संकल्पनेमुळे संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले व त्या सर्वांनी मिळून वाढदिवस स्मशानभूमीतील झाडांसोबत साजरा केला.
झाडांमुळे भालेवाडी गावची झाडांचे गाव अशी संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. व याचमुळे भालेवाडी गाव महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव या शर्यतीत उभे ठाकले आहे. यासाठी पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ.श्रीकांत एकनाथ दवले, माजी ग्रामपंचायत सदस्य (मेंबर) दिलीप शिवशरण, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव भोरकडे, प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण दवले, उद्योजक दादासाहेब गवळी, नेटाफिम उद्योगाचे अधिकृत डिलर शिवाजी पाटील,
महेश मच्छिंद्र गवळी, इंग्रजी विषयाचे शिक्षक बिरुदेव दवले सर, संग्राम ॲग्रो एजन्सीचे मालक हणमंत दवले, युवा नेते संजय घाडगे, दिलीप गवळी मिस्त्री, कन्हैय्या उद्योग समूहाचे मालक श्री. चेतन गवळी, गजानन किराणा स्टोअरचे मालक विजय बाबर,
उद्योजक विजय संजय गवळी, ग्रामपंचायत शिपाई आप्पा घाडगे व निखील भोरकडे, दूध उत्पादक बबन गवळी, डोणज गावातील मित्र अनिकेत शेडबाळ व त्याचे मित्रमंडळ, पांडुरंग साऊंड सिस्टीमचे प्रोपायटर गुरुनाथ शिवशरण, कलाशिक्षक निवृत्ती शिवशरण तसेच गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज