मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आंदोलक मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यामागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू होतं. पण मुंबई पोलिसांपाठोपाठ उच्च न्यायालयाकडून या आंदोलनाची परवानगी नाकारल्यामुळे मनोज जरांगे पाटलांसह अडचणी वाढण्याची शक्यता होती.
तुमच्याकडे आंदोलनाची परवानगी नसेल तर तात्काळ जागा खाली करा नाहीतर 3 वाजता उच्च न्यायलय या संदर्भात आदेश काढेल असे हायकोर्टाने सांगितले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मंगळवारी पहिल्यांदाच मराठा उपसमिती जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानात दाखल झाली होती. सध्या मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला असून त्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपसमितीचे मराठा आंदोलकांचं कौतुक करतो. जितके जास्त बोलतो, तितकं पोटात तुटतंय. आपलं जे म्हणणं होतं. ते लेखी स्वरुपात निवेदन दिले होते. राज्य सरकारचं निवदेन आपल्या अभ्यासकांकडे पाठवणार आहेत.आपल्या मागण्या लेखी स्वरुपात सादर करण्यात आल्या आहेत.

हैद्राबाद गॅझेट तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती.
या मंत्रिमंडळ गॅझेटरला मंत्रिमंडळ समितीची मान्यता देण्यास तयार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. सातारा गॅझेट लागू करण्यास वेळ देतो.तेही पंधरा दिवसांत जलदगतीनं तपासणी करुन विषय मार्गी लावतो, असं सांगण्यात आलं आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मराठा आंदोलकावरच्या सर्व गुन्हे मागे घेतल्या जातील.
यावेळी मनोज जरांगेंनी विषय जरा शांततेनं समजून घेणं महत्त्वाचं आहे. बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 15 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. आता उर्वरित रक्कम आठवडाभराच्या आत बँक खात्यावर जमा करण्यात येईल असं सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपसमितीनं म्हटल्याचंही मनोज जरांगेंनी सांगितलं.

बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याच्या मागणीसह जातप्रमाणपत्रांबाबत तातडीनं निर्णय घ्या अशी मागणीही मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारच्या शिष्टमंडळांकडे केली होती.

वंशावळ समिती गठीत नाही,ती गठीत करण्यात यावी. शिंदे समितीला ऑफिस देण्याची मागणीही त्यांनी लावून दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











